बॉबी डार्लिंगचा पती जेलमध्ये, हे आहे कारण
गेल्या दोन दिवसांपासून रमणिक जेलमध्ये असल्याचे समोर आले आहे.
मुंबई : अभिनेत्री बॉबी डार्लिंगने व्यावसायिक असलेल्या रमणिकशी गेल्यावर्षी लग्न केल. पण हे लग्न काही जास्त दिवस टिकू शकलं नाही. तिने नुकतीच दिल्ली पोलिसांत आपल्या पतीविरुद्ध तक्रार केली. कौंटुबिक हिंसा, अनैसर्गिक सेक्स आणि हुंड्यासाठी जबरदस्ती करण्याचा आरोप त्याच्यावर बॉबीने केलाय. गेल्या दोन दिवसांपासून रमणिक जेलमध्ये असल्याचे समोर आले आहे.
रमणिक गजाआड
बॉबी डार्लिंगचा व्यावसायिक नवरा दोन दिवसांपासून जेलमध्ये आहे. स्पॉटबॉयने यासंदर्भातील वृत्त दिलयं. रमणिकने स्वत: याबद्दल माहिती दिली आहे. जेलमधील आज त्याचा तिसरा दिवस आहे. '११ मेला दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली होती.त्यानंतर दिल्ली पोलिंसांना त्याने एक अर्ज केला होता जो रद्द करण्यात आल्याचे' बॉबी हिने सांगितले.
रमणिक दारू पिऊन मारायचा
रमणिक दारू पिऊन मला मरायचा आणि इतर पुरूषांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करायचा अशी तक्रारही बॉबीने याआधी केली होती.आपली प्रॉपर्टी आणि पैसा बळकावण्याचा आरोपही तिने केलाय.