मुंबई : अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी ओटीटीवर आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. या अभिनेत्रींनी ओटीटीवर येताच असे काही बोल्ड सिन दिलेयत की, पाहून तुम्हाला शब्दच फुटणार नाहीत. तुम्ही जर त्यांना अजूनही पाहिलं नसेल, तर आज आम्ही तुम्हाला त्यांच्या कामाबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अभिनेत्रींनी आपल्या साकारलेल्या व्यक्तीरेखेला आपल्या अभिनयाने न्याय मिळवून दिला आहे. चला त्या अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊ या.


कंगना शर्मा 



'मोना होम डिलिव्हरी'मध्ये दिसलेली कंगना शर्माने कॉल गर्लची भूमिका साकारली होती. वेब सीरिजशिवाय कंगना शर्माने ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटातही काम केले आहे. उल्लू अॅपवर तुम्ही कंगना शर्माची वेब सीरिज पाहू शकता.


राणी चॅटर्जी



या यादीत राणी चॅटर्जीचे नाव देखील समाविष्ट आहे, जी एक भोजपुरी अभिनेत्री आहे. खरं तर, भोजपुरी चित्रपटांव्यतिरिक्त राणी चॅटर्जी वेब सीरिज मस्तराममध्ये दिसली होती, ज्यामध्ये राणीच्या बोल्डनेसची बरीच चर्चा झाली होती. तुम्ही ही सीरीज MX Player वर पाहू शकता.


आभा पॉल



आजकाल हे नाव खूप लोकप्रिय झाले आहे. ओटीटीच्या जगात लोलिता भाभी या नावाने प्रसिद्ध असलेल्या आभा पॉलच्या बोल्डनेसबद्दल बोलतानाही भल्याभल्यांना घाम फुटतो. आभा पॉल अनेक वेब सीरिजमध्ये दिसली आहे, पण ती डर्टी टॉकसाठी सर्वाधिक चर्चेत आली आहे.


त्रिधा चौधरी



छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या त्रिधा चौधरीला आश्रम वेब सीरिजमधून ओळख मिळाली. ज्यामध्ये तिने बॉबी देओलसोबत बोल्ड सीन्स देऊन रातोरात प्रसिद्धी मिळवली. तिला या शैलीत पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. या मालिकेत त्रिधाचे खूप बोल्ड सीन्स आहेत.


फ्लोरा सैनी



फ्लोरा सैनी आणि अन्वेशी जैन यांनी एएलटीबालाजीच्या सर्वात लोकप्रिय वेब सीरीज 'गंती बात'मध्ये केलेलं काम सर्वांनीच पाहिलं आहे. या वेब सीरिजमध्ये या सुंदरींची बरीच चर्चा झाली होती.


रसिका दुगल



रसिका दुगलच्या धाडसी अभिनयाबद्दल काय बोलावे. या बोल्ड स्टाइलमुळे तिला ओटीटी वर्ल्डची राणी म्हटले जाते. तिने मिर्झापूरमध्ये बीना त्रिपाठीची भूमिका केली होती आणि हे पात्र किती बोल्ड होते, हे सांगण्याची गरज नाही. यानंतरच रसिकाचे नाव बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत सामील झाले.