मुंबई : राज कपूर... हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हा चेहरा ‘शो मॅन’ म्हणूनही ओळखला जातो. कलेचा त्यातूनही अभिनय आणि चित्रपट कलेचा वारसा असणाऱ्या कपूर कुटुंबानं आजवर बॉलिवूडमध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. अशा कुटुंबात जन्मलेल्या राज कपूर यांनी हिंदी कलाजगताला सुपरहिट चित्रपट दिले. त्यांना यात साथ मिळाली ती म्हणजे अभिनेत्री नर्गिस यांची. (Raj Kapoor Nargis)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘आरके’ बॅनरअंतर्गत साकारलेल्या बऱ्याच चित्रपटांचा खरा चेहरा ठरल्या नर्गिस. राज कपूर यांच्याशी यादरम्यान त्यांचं प्रेमाचं नातंही जुळलं. जवळपास 8 वर्षांसाठी ही जोडी रिलेशनशिपमध्ये होती. पण, जेव्हा राज आपल्याशी लग्न करणार नसल्याचं नर्गिस यांच्या लक्षात आलं तेव्हा मात्र त्यांनी या कलाकापासून कायमचा दुरावा पत्करला.


ही प्रेमकहाणी इथंच थांबली नाही. 1973 मध्ये जेव्हा ‘बॉबी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा राज कपूर आणि नर्गिस यांची नावं आणि त्यांचं नातं पुन्हा चर्चेचा विषय ठरलं. निमित्त होतं ती म्हणजे अभिनेत्री डिंपल कपाडिया.


डिंपल ही नर्गिस आणि राज कपूर यांच्याच प्रेमाच्या नात्यातून जन्माला आलेली मुलगी असल्याच्या चर्चांनी त्या काळात जबरदस्त जोर धरला. प्रत्येकाच्या तोंडी हाच चर्चेचा विषय तेव्हा पाहायला मिळाला.


दोघांच्याही चेहऱ्याशी साम्य असणाऱा डिंपलचा चेहरा, चित्रपटातून तिच्या पात्रातून झळकणारी नर्गिस यांची झलक आणि पहिल्यांदाच नर्गिस यांची राज कपूर यांच्याशी झालेली भेट चित्रपटातून साकारण्यात आल्यामुळं चर्चा अधिक गडद होऊ लागल्या होत्या.


आपल्याविषयी झाललेया या चर्चांवर पुढे खुद्द डिंपल यांनीच विनोद करत तुम्ही मला कधी संजय दत्तची सावत्र बहिण म्हणून पाहाल तरी.. ? असा विनोदही केला होता.


दरम्यान, आपल्याविषयी अशा चर्चा, अफवा पसरवणाऱ्यांची विचारशक्ती किती हीन आहे असं म्हणत कोणत्याही निष्कर्षावर अशी अचानक उडी मारणं घातक असल्याचं म्हटलं.


मी कधीच माझ्या स्वत:च्या मुलीला असं वाऱ्यावर सोडलं नसतं. डिंपलनं या सगळ्याकडे विनोद म्हणून पाहिलं हे योग्यच केलं असं म्हणत आपल्या कुटुंबानंही याकडे दुर्लक्ष केल्याचं नर्गिस म्हणाल्या होत्या. फक्त संजय दत्तनं या साऱ्यावर नाराजी व्यक्त केल्याचं त्यांनी अधोरेखित केलं होतं.