मुंबई : अभिनेता अजय देवगनच्या 2 वेगवेगळ्या सिनेमांमध्ये मुलगा आणि मुलगीची भूमिका करणाऱ्या दोन बॉलिवूड कलाकारांनी विवाह केला आहे. अभिनेता वत्‍सल सेठ आणि अभिनेत्री इशिता दत्ता यांनी मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये विवाह केला. पण यांचा विवाह खूपच गपचूप पद्धतीने केला गेला. इशिता आणि वत्‍सलने याबाबत खुलासा केला. ज्या शोमध्ये हे दोघे पहिल्यांदा भेटले होते त्या शोच्या सुरुवातीलाच या दोघांना 'नो अफेयर कॉन्‍ट्रॅक्‍ट'वर स्वाक्षरी करावी लागली होती. त्यामुळे या दोघांना या शोच्या दरम्यान प्रेम करण्याची परवानगी नव्हती. पण तरी या शोदरम्यान या दोघांना प्रेम झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


इशिता कपिल शर्माच्या 'फिरंगी' सिनेमामध्ये देखील झळकली होती. वत्‍सल आणि इशिता टीव्ही शोमध्ये एकत्र काम करत होते. लग्नाच्या 9 महिन्यानंतर ही जोडी पुन्ही एकदा एकत्र दिसणार आहे. 'कौन है' या शोमध्ये हे एकत्र दिसतील. वत्सलने एका मुलाखतीत म्हटलं की, 'माझ्या अनेक मित्रांना अजूनही विश्वास होत नाही की मी आणि इशिता शोदरम्यान एकमेकांना डेट करत होतो. पण सत्य असं आहे की, शो संपल्यानंतर ही आम्ही एकमेकांना डेट करत होतो त्यावेळी दोघांना प्रेम झालं.'


वत्‍सलने पुढे म्हटलं की, 'बाजीगर'च्या शूटिंग दरम्यान खूप मज्जा आली. पण त्यावेळी आम्ही कपल नव्हतो. इशिता दत्ताने या मुलाखतीत म्हटलं की, अनेक कॉर्पोरेट हाउस अशी पॉलिसी ठेवतात आणि यात काही चुकीचं देखील नाही. पण मला नाही वाटत की प्रेमाच्या भावनेला रोखून ठेवलं जाऊ शकतं.'


इशिता दत्ता हिने मिस इंडिया आणि अभिनेत्री तनुश्री दत्ताची बहिण आहे. इशिता अजय देवगनचा सिनेमा 'दृश्‍यम'मध्ये देखील होती. वत्‍सल सेठने अजय देवगनच्या 'टार्झन' सिनेमात त्याच्या मुलाची भूमिका केली होती.