Amir Khanला हा किसिंग सीन करताना घाम फुटला, कोण होती अभिनेत्री?
पहिल्याच चित्रपटात अमिरचा किसींग सीन होता
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानने 1984.. मध्ये 'होली' चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. या चित्रपटात आमिरची नायिका किटू गिडवानी होती. त्यावेळी आमिर खान खूप लाजाळू आणि रिजर्व व्यक्ती होता. पहिल्याच चित्रपटात तो आणि किटू गिडवाणी यांचा किसींग सीन होता. यानंतर अमिरचा दुसरा चित्रपट जूही चावलासोबत 'कायमत से कायमत तक' आला. या चित्रपटातही आमिरने जूहीबरोबर लिप-लॉक सीन शूट केले.
यानंतर, आमिर खान आणि 'किस' हे नातं अतूट झालं आणि त्याने त्याच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात किसिंग सीन द्यायला सुरवात केली. यावेळी आमिर खानला 'आंतक ही आतंक' नावाच्या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती, यात जूही चावला आणि रजनीकांत यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
या चित्रपटात पूजा बेदीने छोटीशी भूमिका साकारली होती. आमिरचा इंटिमेट लव्ह मेकिंग सीन पूजासोबत शूट करण्यात येणार होता. मात्र, आमिर आणि पूजा या दोघांनाही या सीनबद्दल कोणताही आक्षेप नव्हता, मात्र मीडिया रिपोर्टनुसार चित्रपटाच्या दिग्दर्शकांना या सीनचं चित्रीकरण करायचं होतं आणि त्यांना धक्का बसला.
मात्र, आमिर खान आणि पूजा बेदीमध्ये इंटिमेट सीन शूट केला गेला पण त्यानंतर दोघंही तणावात गेले. आमिरने दिग्दर्शकाला सांगितलं की, या सीनमुळे आम्हाला प्रोब्लेम होवू शकतो. इतकंच नाही तर एडिट करताना हा सीन त्याने दिग्दर्शकाला चित्रपटातून काढून टाकायला सांगितला. अखेर बर्याच लोकांनी समजवल्यानंतर दिग्दर्शक दिलीप शंकर यांना चित्रपटातून तो सीन हटवावा लागला.