मुंबई : 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता आमिर खान याची मुलगी आयरा सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. विविध मुदद्द्यांवर, डिप्रेशनपासून इतरही काही विषयांवर खुलेपणानं बोलणाऱ्या आयरानं कधीच तिचं खासगी आयुष्य लपवून ठेवलं नाही. (Bollywood Actor aamir khan daughter ira khan shares intimate photos with boyfriend nupur shikhare)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे याला आयरा गेल्या दोन वर्षांपासून डेट करत आहेत. याच नात्याला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयरानं नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. 


इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या फोटोंमध्ये ती, नुपूरसोबत बरीच इंटिमेटही झाल्याचं दिसत आहे. 'या गोष्टीला जवळपास दोन वर्ष झालीयेत. पण, आता असं वाटतंय की, हे असंच सुरु होतं. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे', असं कॅप्शन तिनं या फोटोंना लिहिलं. 


आयराच्या फोटोवर आणि या पोस्टवर कमेंट करत हे सर्व आधीपासूनच असं होतं, आपल्याला याची जाणीव फक्त दोन वर्षांपूर्वी झाली म्हणत नुपूरनंही तिच्यावरील प्रेम व्यक्त केलं. 



आयरा आणि नुपूर त्यांच्या कामातून वेळ काळत शक्य तितका वेळ एकत्र व्यतीत करताना दिसत आहेत. एकमेकांसोबतचे फोटो शेअर करणं असो किंवा मग एकमेकांसोबत विविध ठिकाणी फिरण्यासाठी जाणं असो, आयरा आणि नुपूर कायमच Couple Goals देताना दिसतात.