मुंबई : अभिनेता आमिर खान हा त्याच्या प्रत्येक चित्रपटाच तितक्याच वेगळ्या रुपात दिसतो. प्रत्येक वेळी एका नव्या भूमिकेचा स्वीकार करत आमिर ती मोठ्या ताकदीने साकारतोही. सोशल मीडियावर सध्याच्या घडीला व्हायरल होणाऱा आमिरचा एक फोटोही सध्या हीच बाब अधोरेखित करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'लाल सिंग चड्ढा' या आगामी चित्रपटातील आमिरचा लूक सर्वांच्या भेटीला आला आहे. त्याचा हा लूक पाहता चाहते पुन्हा एकदा थक्क झाले आहेत. 'लाल सिंग चड्ढा'च्या निमित्ताने व्हायरल होणाऱ्या या लूकमध्ये आमिर एका शीख व्यक्तीच्या रुपात दिसत आहे. हलक्या गुलाबी रंगाची पगडी, स्पोर्ट्स शूज, चौकटींचं शर्ट, भरगच्च दाढी असा एकंदर लूक आमिर साकारत असणाऱ्या भूमिकेला चार चाँद लावत आहे. 




अभिनेत्री करिना कपूरही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. 'लाल सिंग चड्ढा' हा टॉम हँक्सची मुख्य भूमिका असणाऱ्या 'फॉरेस्ट गंप' या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटासाठी आमिरने बरीच मेहनत घेतली असून जवळपास २० किलो वजन घटवल्याचं म्हटलं जात आहे. तेव्हा आता ज्या भूमिकेसाठी हा परफेक्शनिस्ट आमिर इतकी मेहनत घेत आहे ती भूमिका नेमकी कशी आहे, हे येत्या काळात पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे.