मुंबई : बॉलिवूड अभिनेता ( Aamir Khan Kiran Rao ) आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी 15 वर्षांच्या वैवाहिक नात्यातून विभक्त होण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला. ज्यानंतर या जोडीनं त्यांच्या घटस्फोटाचीही अधिकृत घोषणा केली. आमिर आणि किरणच्या नात्याला अशा पद्धतीनं तडा जाणं ही बाब अनेकांना धक्का देऊन गेली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'लगान' चित्रपटाच्या सेटवर आमिर आणि किरणची मुलाखत झाली होती. या चित्रपटासाठी तिनं सहाय्यत दिग्दर्शनाचं काम पाहिलं होतं. किरणशी विवाहबंधनात अडकण्यापूर्वी आमिरनं रिना दत्ताशी असणारं त्याचं नातं संपुष्टात आणलं होतं. 


2005 मध्ये किरणशी विवाह 


पहिल्या लग्नातून वेगळं झाल्यानंतर आमिरला किरणनं साथ दिली. किरणनं त्याला बरीच साथ दिली होती. अखेर या जोडीनं 2005 मध्ये विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. या नात्यात जवळपास 15 वर्षे एकमेकांना साथ दिल्यानंतर मात्र आमिर आणि किरणनं वेगळ्या वाटा निवडल्या. 


राजघराण्याशी जोडलं गेलंच किरणचं नातं... 


किरण राव (Kiran Rao)ची ओळख आमिरची दुसरी पत्नी अशा अर्थानं होत असली तरीही तिची आणखीही एक ओळख आहे. किरणचं नातं एका राजघराण्याशी जोडलं गेलं आहे. लोकप्रिय बॉलिवूड सौंदर्यवती, अभिनेत्री अदिती राव हैदरी ही किरणची मामे बहीण आहे. किरण रावचे आजोबा, जे. रामेश्वर राव हे वानापार्थीचे राजा होते. वानापार्थी सध्याच्या तेलंगाणा या राज्यात येतं. 


त्या 30 मिनिटांच्या कॉल नंतर सुरु झाली आमिर आणि किरणची लव्ह स्टोरी


 


नात्यातून विभक्त होत असताना आमिर- किरण काय म्हणाले? 


'15 वर्षांच्या वैवाहिक जीवनाच्या सुंदर प्रवासामध्ये आम्ही आयुष्यभरासाठी स्मरणात रहावेत असे अनुभव घेतले, आनंदाच्या क्षणांचे साक्षीदार झालो, खुप हसलो. आमचं नातं प्रेम, विश्वास आणि आदर यांच्याच बळावर आणखी खुललं. आता आम्हाला आमच्या नात्याची नवी सुरुवात करायची आहे. पण, पती- पत्नी म्हणून नव्हे, तर एका मुलाचे पालक म्हणून आणि एकमेकांचे कौटुंबीक सदस्य म्हणून. काही काळापूर्वीच आम्ही ठरवल्याप्रमाणं विभक्त झालो होतो. वेगळे राहत होतो, त्याचवेळी एका कुटुंबातील सदस्य आपले अनुभव, घटना एकमेकांना सांगतात तसंच सर्व सुरु होतं.', असं आमिर आणि किरणनं आपल्या नात्याला पूर्णविराम देताना म्हटलं.