मुंबई : लग्न असो किंवा साखरपुडा किंवा कोणाचा वाढदिवस, बॉ़लिवूडची गाणीही प्रत्येक ठिकाणी गाजतात. सध्या ही गाणी गाजत आहेत ती थेट सातासमुद्रापार, स्वित्झर्लंडमध्ये. परदेशात ही गाणी गाजण्यामागे निमित्तंही तसंच आहे. ते निमित्त आहे एका लग्नाचं. रिलायन्स उद्योह समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी लवकरच श्लोका मेहती हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. ज्या निमित्ताने आता लग्नसोहळ्यापूर्वीच्या समारंभांना दणक्यात सुरुवात झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशा अंबानीच्या लग्नात ज्याप्रमाणे कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली होती, त्याचप्रमाणे आकाशच्या लग्नसोहळ्याआधीपासूनच बी- टाऊन कलाकार मोठ्या हक्काने अंबानी कुटुंबीयांच्या आनंदात सहभागी झाले आहेत. आकाश आणि श्लोकाच्या लग्नाच्या निमित्ताने एक दिमाखदार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी आमिर खान, शाहरुख खान यांनी एकच धमाल केल्याचं पाहायला मिळत आहे. आमिरसोबत श्लोका 'ए... क्या बोलती तू..' या गाण्यावर ठेरा धरत आहे. तर, नीता आणि मुकेश अंबानीसुद्धा या सोहळ्याचा आनंद घेताना दिसत आहेत. 






कलाविश्वाचं अंबानी कुटुंबाशी असणारं नातं सर्वांनाच ठाऊक आहे. दिवाळीची पार्टी म्हणू नका किंवा आणखी एखादा कौटुंबीक समारंभ प्रत्येक वेळी ही कलाकार मंडळी अंबानी कुटुंबाचाच एक भाग म्हणून समोर येतात आणि सर्वांचीच मनं जिंकून जातात. पण, यावेळी मात्र आमिरने आपण वधूपक्षाकडून असल्याचं म्हणत श्लोकाला आपण तिच्या लहानपणापासूनच ओळखत असल्याचं सांगितलं. अंबानी आणि मेहता या दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी यावेळी परफेक्शनिस्ट आमिर आपल्या बाजूने असल्याचं कळताच संगीत सोहळ्यात जल्लोष करण्यास सुरुवात केली.