मुंबई : सेलिब्रिटी हे त्यांच्या खासगी आयुष्याविषयी नेहमीच प्रकाशझोतात असतात. अनेकदा त्यांचा एखादा साधा फोटोही बरंच काही सांगून जातो. सध्याच्या घडीला असाच एक फोटो कलाविश्वात सर्वांचं लक्ष वेधत आहे. हा फोटो आहे, मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण रावचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिरनेच सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ते दोघंही एका खेडेगावातील ढाब्यावर थंडगार ऊसाचा रस आणि भेळपुरीचा आस्वाद घेताना दिसत आहेत. त्यांना सोबत आहे ती म्हणजे कधीही न संपणाऱ्या गप्पांची आणि एका महत्त्वाच्या हेतूची. Zhawadarjun या खेडेगावापाशी असणाऱ्या ढाब्याला आमिरने भेट दिल्याचा आनंद तेथील स्थानिकांच्या चेहऱ्यावरुनही झळकत आहे. परफेक्शनिस्ट आमिरने या ढाब्यावर असणाऱ्या स्थानिकांसोबतचाही फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे एका अर्थी किरण आणि आमिरची ही अनोखी डेट व्हायरलच होत आहे, असं म्हणायला हरकत नाही. 



महाराष्ट्रातील अनेक खेड्यांमध्ये असणारी दुष्काळाची परिस्थिती पाहता त्यावर आपल्या परिने तोडगा काढत स्थानिकांच्या मदतीने हा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांचं अतिशय महत्त्वपूर्ण योगदान पाहायला मिळत आहे. पाणी फाऊंडेशनच्या निमित्ताने ते अनेक खेड्यांपर्यंत पोहोचले असून, त्यांना कलाविश्व आणि चाहत्यांच्या वर्तुळातूनही मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळालं आहे. ज्यामुळे खऱ्या अर्थाने किरण आणि आमिर प्रेक्षकांना चौकटीबाहेरील #CoupleGoals देत आहेत, असंच म्हणावं लागेल.