Drishyam 2 Trailer: अजय देवगणचा दृश्यम हा चित्रपट सात वर्षांपुर्वी प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील संवाद आणि कथा चाहत्यांच्या पसंतीस उतरले होते. ही रहस्यमय कथा भारतातच नाही तर परदेशातील प्रेक्षकांनाही प्रचंड आवडली. या चित्रपटातील 2 ऑक्टोबरच सहस्य काय याचा प्रश्न आजही प्रेक्षकांना पडला आहे. पण आता हे रहस्य उलगडणार असून या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (bollywood actor ajay devan's movie drushyam teaser went viral on social media)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ट्रेलरवर प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. हा ट्रेलर प्रेक्षकांना आवडला आहे. परंतु एका गोष्टीनं मात्र अख्खं बॉलीवूड हादरलं आहे. याचं कारण असं की या टिझरमधून अजय देवगननं एक सनसनाटी कबूली दिली आहे. घाबरू नका ही कबूली फार गंभीर नाही तर कारण ही कबूली अजय देवगणची नाही तर विजय साळगावकर यांची आहे. 


दृश्यम या चित्रपटातून आता नवं रहस्य उलगडणार असून विजय साळगावंकर नक्की कसली कबूली देणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. 


टीझरपूर्वी अजयनं इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर तसेच रिलीज डेटची प्रेक्षकांसोबत शेअर केली होती. पोस्ट शेअर करताना अजयनं कॅप्शनमध्ये लिहिले, 'जे दिसले ते घडले नाही, काय झाले हे कोणालाच माहीत नाही! 12 वाजता चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार आहे.


 

 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



बॉलीवूड अभिनेता अजय देवगणच्या या चित्रपटाच्या पहिल्या भागाने 2015 मध्ये बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले होते. चित्रपटाच्या पहिल्या भागात अजयशिवाय श्रिया सरन, तब्बू, इशिता दत्ता दिसल्या होत्या. या कमी किमतीच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.