मुंबई : अभिनेत्री तब्बू गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमधून गायब होती. आता ती नव्याने पुनरागमन करत आहे. तीही कॉमेडी सिनेमातून. 'गोलमाल अगेन' या चित्रपटानंतर अजय आणि तब्बू आणखी एका रोमॅण्टिक कॉमेडी 'रोमकॉम' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हकीकत', 'तक्षक', 'फितूर', 'विजयपथ' आणि 'दृश्यम' या सिनेमातून एकत्र काम केल्यानंतर तब्बू आणि अजय देवगण या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. रोहित शेट्टीच्या 'गोलमाल अगेन' या चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  


अजय देवगण मुख्य भूमिका साकारत असलेल्या एका सिनेमामध्ये तब्बूचीसुद्धा महत्त्वाची भूमिका असणार आहे. तब्बूव्यतिरिक्तही या चित्रपटात आणखी एक अभिनेत्री झळकणार असून, तिचं नाव अद्यापही जाहीर करण्यात आलं नाही. 



चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनीही ट्विट करत त्यासंबंधीची माहिती दिली. अजय देवगण पुन्हा एकदा रोमकॉम चित्रपटांकडे वळला असून, त्याच्या आगामी चित्रपटांची निर्मिती भूषण कुमार, लव रंजन आणि अंकुर गर्ग करणार आहेत.