मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसशी लढा देत असणाऱ्या अनेक कोविड योद्ध्यांना समाजातील प्रत्येक स्तरातून सलाम केलं जात आहे. सानथोरांपासून प्रत्येक जण डॉक्टर, नर्स, परिचारिका, सफाई कर्मचारी या साऱ्यांनाच त्यांच्या कामासाठी शाबासकीची थाप देत आहेत. पोलीस यंत्रणेप्रतीही नागरिक, मंत्रीमहोदय आणि सेलिब्रिटी मंडळींनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केल्याचं वेळोवेळी पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीसांच्या पाठीवर कायमच शाबासकीची थाप देणा्ऱ्यांमध्ये अभिनेता अक्षय कुमार कायमच आघाडीवर असतो. पुन्हा एकदा आपल्या कृतीतून त्याने हे सिद्ध  केलं आहे. कोविड 19 च्या लक्षणांची प्राथमिक पातळीवरच माहिती मिळावी यासाठी त्याने मुंबई पोलिसांमध्ये जवळपास १ हजार रिस्ट बँडचं वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. 


एका आघाडीच्या हेल्थ ब्रँडच्या ब्रँड अँम्बेसेडरपदी असणाऱ्या अक्षयने कोरोना व्हायरसच्या या संकटाच्या काळात एका नव्या संकल्पनेसह नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीही हे अनोखं पाऊल उचलल्याचं कळत आहे. 


कोरोनाशी लढत असताना मुंबई पोलिसांना या विषाणूच्या संसर्गाविषयीची माहिती मिळावी, यासाठीच त्याने ही मदत देऊ केली आहे. किंबहुना मुंबई पोलिसांची तुकडी ही अशी पहिली तुकडी असेल जेथे विषाणूच्या संसर्गाच्या साखळीचा पाठपुरावा अशा अद्ययावत पद्धतीने केला जाणार आहे. मुंबई पोलिसांसाठी मदत करण्याची अक्षयची ही पहिलीच वेळ नाही. 


 


वाचा : 'सेक्रेड गेम्स', 'मिर्झापूर'पेक्षाही प्रेक्षकांना 'पाताल लोक'


 


बॉलिवूडच्या या खिलाडी कुमारने यापूर्वी कोरोनाविरोधातील लढ्यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये तब्बल २५ कोटी रुपयांची मदत दिली होती. याशिवाय वेळोवेळी त्याने मुंबई महानरगपालिकेलाही कोरोनाविरोधातील लढ्यातसहकार्य करत त्यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. सामाजिक भान जपण्यासाठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याची रुपेरी पड्यावरील भूमिका जिकती सुपरहीट असते, तितकीच खऱ्या आयुष्यातील भूमिकाही प्रेक्षकांची मनं जिंकते असं म्हणणं वावगं ठरणार नाही.