मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची महत्त्वाची भूमिका असणारा 'लक्ष्मी बॉम्ब' हा चित्रपट आता अखेर डिजिटली प्रदर्शित होणार आहे. हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर खिलाडी कुमारचा हा बहुचर्चिच चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी हॉटस्टारला हा तो तब्बल १२५ कोटी रुपयांना विकला असल्याचं सांगण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ळपास गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन सुरु आहे. परिणामी सर्वच क्षेत्रांवर याचे थेट परिणाम पाहायला मिळत आहेत. ज्यामुळे गेल्या काही काळापासून चित्रपटगृहांमध्येही सिनेमे दाखल झालेले नाहीत. अनेक बड्या कलाकारांच्या चित्रपटांना याचा फटका बसला आहे. ज्यानंतर आता अतिशय प्रभावी आणि फार कमी कालावधीत तितक्याच झपाट्याने लोकप्रियता मिळवणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे निर्माते- दिग्दर्शक आणि कलाकारांचा ओघ वाढू लागला आहे. 


 


तामिळ चित्रपट 'कांचना'चा रिमेक असणाऱ्या या चित्रपटात अक्षय मध्यवर्ती भूमिकेत आहे. ज्याला एका तृतीयपंथी व्यक्तीच्या आत्म्याने झपाटलेलं असतं असं चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे त्याची ही आगळीवेगळी भूमिका पाहणं चाहत्यांसाठी परवणी ठरणार आहे. खिलाडी कुमारने आतापर्यंत साकारलेल्या भूमिका आणि त्याला मिळालेली लोकप्रियता पाहता आता या लक्ष्मी बॉम्बचा धमाका कुठवर गुंजणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.