मुंबई : देशात गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्रीत मोठा वाद सूरू आहे. याच वादावरून बॉलिवूड अभिनेते आणि साऊथ अभिनेत्यांमध्ये शाब्दीक खटके उडत आहेत. त्यात आता बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कूमार याने या वादावर प्रतिक्रीया दिली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय कुमार हा त्या बॉलिवूड सुपरस्टार्सपैकी एक आहे, ज्याचे एका वर्षात ५-६ चित्रपट प्रदर्शित होत असतात. नुकताच त्याचा पृथ्वीराज हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटामुळे तो खूप चर्चेत आला आहे. 


अक्षय कुमार नेहमीच स्वत:ला वादांपासून दूर ठेवतो आणि वादग्रस्त विधाने करणेही टाळतो, पण यावेळी त्याला बॉलिवूड विरुद्ध साऊथ बद्दल त्याचे मत विचारण्यात आले होते. यावेळी त्याने गप्प बसण्याऐवजी आपले मत मांडलेय. ब्रिटिशांनी देशाची फाळणी केली,तुम्ही ते करू नका. काही लोक बोलत असतील तर तुम्ही बोलू नका,असे आवाहन अक्षय कुमार यांनी केले. 


ब्रिटिशांनी देशाची फाळणी केली. भारताचा पूर्व भारत, दक्षिण भारत, उत्तर भारत अशी विभागणी केली. तुम्ही तुमच्या देशासाठी काय करू शकता आणि देशाला काय देऊ शकता याचा विचार करा.काही लोक बोलत असतील तर तुम्ही बोलू नका.  कोणी काहीही म्हणो, आपण सर्व एक आहोत. त्यांचेही चालावे,आमचेही चालावे, तरच आमचा फायदा होईल, नाही का? असेही तो म्हणाला. 


अक्षय कुमारच्या या विधानावर आता साऊथ इंडस्ट्रीतले अभिनेते काय प्रतिक्रीया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.