मुंबई :  शारीरिक सुदृढता आणि साहसी कृत्यांसाठी अभिनेता अक्षय कुमार याची एक वेगळी आणि तितकीच खास अशी ओळख आहे. कायमच काहीतरी वेगळं करण्याच्या प्रतिक्षेत असणारा आणि इतरांनाही कायमच सुदृढतेचे धडे देणाऱ्या अक्षयने एका कलाकाराचा जीव वाचवला आहे. मनिष पॉलच्या 'मुव्ही मस्ती विथ मनिष पॉल' या कार्यक्रमादरम्यान अक्षयच्या समयसूचकतेचा वापर झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर याच कार्यक्रमातील एक व्हिडिओ व्हायरल  झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक स्टंट करताना कलाकाराची प्रकृती अचानक बिघडली. हार्नेस लावलेल्या एका कलाकाराच्या शरीरातील त्राण निघून गेल्यासारखं झालं आणि कार्यक्रमाच्या सेटवर तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. 


त्याचवेळी या कार्यक्रमात 'हाऊसफुल्ल ४' या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आलेल्या अक्षय कुमारने पुढे सरसावत त्या कलाकाराची मदत केली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच चाहत्यांनी अक्षयची पाठ थोपटत त्याची प्रशंसा करण्यास सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपासून अक्षय त्याच्या आगामी चित्रपटांच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र असल्याचं पाहायला मिळत आहे.



'हाऊसफुल्ल ४'च्या प्रसिद्धीशिवाय तो इतर चित्रपटांच्याही कामात लक्ष देत आहे. याचा प्रत्यय त्याने नुकतंच शेअर केलेला एक फोटो पाहून आला. ज्यामध्ये तो स्त्रीरुपात दिसत आहे. 'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटातून तो एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत झळकणार आहे.