अखेर शरणागती! कोणासाठी चक्क आमीरनं मागितली माफी?
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान `लाल सिंग चढ्ढा`ला होणाऱ्या निषेधावरून दिलगिरी व्यक्त केली आहे.
Amir Khan : मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा 'लाल सिंग चढ्ढा' उद्या संपुर्ण देशात तसेच देशाबाहेर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटावरून गेले काही दिवस रणकंदन माजले आहे. सर्वत्र बॉयकोट लाल सिंग चढ्ढाचे हॅशटॅग फिरत आहेत. महिन्याभरापासून हा हॅशटॅग फिरत असून या चित्रपटाला प्रेक्षकांनी कडाडून विरोध केला आहे. या चित्रपटाला होणारा विरोध काही संपता संपत नाहीये. त्यातून आमीर खानने आता या सगळ्या वादाला घेऊन शरणागती प्रत्करली आहे.
सध्या आमीर खान हा आपल्या चित्रपटाला होणारा सगळा विरोध पत्करून चित्रपटाचे प्रमोशन करतो आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान 'लाल सिंग चढ्ढा'ला होणाऱ्या निषेधावरून दिलगिरी व्यक्त केली आहे. दिल्लीच्या पीव्हिआरला आयोजित करण्यात आलेल्या एका मुलाखतीत आमीर खानने हजेरी लावली होती.
या मुलाखतीदरम्यान आमीर खानने जवळपास माफीनामाच सादर केला आहे, तो म्हणाला, ''जर मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील अथवा माझ्या बोलण्यावरून कोणी दुखी झाले असेल तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. चित्रपट आवडणं, नाही आवडणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु या चित्रपटातून केवळ मीच काम केले नाही तर अनेक जणांनी यात काम केले आहे. तेव्हा कृपया 'लाल सिंग चढ्ढा' हा चित्रपट पाहा आणि मला खात्री आहे की तो तुम्हाला नक्कीच आवडेल'', अशी भावना आमीर खानने व्यक्त केली आहे.
काही दिवसांपुर्वींच आमीर खानने प्रसारमाध्यमांशी बोलताना 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका, कृपया माझा चित्रपट जाऊन पाहा, अशी विनवणी केली होती. त्यावेळी आमीर खानच्या 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटाला होणारा विरोध प्रचंड वाढला होता. आपल्या चित्रपटावरती असलेला हा प्रचंड रोष पाहता शेवटी आमीर खानने मौन सोडले होते.
'लाल सिंग चढ्ढा' चित्रपटाच्या प्रमोशनवेळी दिलेल्या मुलाखतीत आमीर खानने स्पष्टीकरण दिले होते. तो म्हणाला होता की, ''लोकांना असे वाटते की माझे माझ्या देशावर प्रेम नाही परंतु ही वस्तुस्थिती नाही तर माझे या देशावर खरोखरच मनापासून प्रेम आहे, आदर आहे. पण मला कळत नाही की लोकांचा असा समज का झालाय का आहे की माझं देशावर प्रेम नाही. लोकांना हा गैरसमज करून घेऊ नये'', असे स्पष्ट करत आपला चित्रपट लोकांनी पाहावा अशी आर्जवी विनंतीही आमीर खानने केली होती.
आमीर खानवर आरोप..
आमीर खानने मागितलेल्या माफीवरती दिग्दर्शक अद्वैत चौहान याने आरोप केले आहेत, त्याच्यामते, ''आमीर खानच्या 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटाला केलेल्या ट्रोलिंगवरून आत्तापर्यंत ट्रोलर्सना याचे पैसे मिळाले असल्याचे नमूद करत त्याने आमीर खानला लक्ष्य केले आहे.