मुंबई : सिनेसृष्टीतील महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांचे जगभरात अनेक चाहते आहेत. त्यांचा अभिनय, त्यांच्या आवाजाची आजही तितकीच क्रेझ आहे. या वयातही बिग बी अनेक तरूणांचे रोल मॉडेल आहेत. सिल्वर स्क्रिनवरून चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या बॉलिवूड शहंशाहने अभिनय क्षेत्रातील ५० वर्ष पूर्ण केली आहेत. बिग बींना अभिषेक बच्चनने एका खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठ्या पडद्यावर, छोट्या पडद्यावर किंवा अगदी जाहिरात क्षेत्रातही बिग बींची जादू आजही कायम आहे. पण त्यांनी सिनेसृष्टीवर केलेली ही जादू काही एक-दोन वर्षे नाही तर तब्बल ५० वर्षांपासून जशीच्या तशी आहे. हिंदी सिनेसृष्टीत अमिताभ बच्चन यांनी अर्धशतक पूर्ण केलं आहे. या खास दिवशी अभिषेक बच्चनने वडिलांसाठी एक भावनात्मक पोस्ट लिहिली असून त्यासोबत बिग बींचा त्या काळातील अॅन्ग्री यंगमॅनचा फोटो असलेलं टिशर्ट घातलं आहे. या टिशर्टसोबतचा फोटो पोस्ट करत अभिषेकने त्यासोबत कॅप्शनही लिहिलं आहे. 



'माझ्यासाठी ते आयकॉन आहेत. इतकंच नाही तर त्यापेक्षाही खूप काही आहेत. वडिल, मित्र, मार्गदर्शक, आदर्श, एक हिरो, मोठा आधार आहेत. आजपासून ५० वर्ष आधी त्यांनी चित्रपटसृष्टीतून आपला प्रवास सुरू केला. कामाप्रती असलेलं त्यांच प्रेम आजही पहिल्या दिवशी होतं तितकंच आहे. येणाऱ्या पुढील ५० वर्षांतही तुम्ही असंच काम कराल.' 



अमिताभ बच्चन यांनी १९६९ साली 'सात हिंदुस्तानी' चित्रपटातून त्यांच्या करियरची सुरूवात केली होती. त्यानंतर १९७१ साली अभिनेते राजेश खन्ना आणि ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित 'आनंद' चित्रपटात अमिताभ यांनी साइड हिरोची प्रमुख भूमिका साकारली होती. १९७३ साली 'जंजीर'मधून साकारलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेतून लोकांच्या मनात आपली जागा निर्माण केली. आणि ती आजही कायम आहे. त्यानंतर सुरू झालेल्या महानायक अमिताभ बच्चन यांच्या सिनेसृष्टीतील न थांबणाऱ्या प्रवासाने यशाची ५० वर्ष पूर्ण केली आहेत.