मुंबई : महानायक अमिताभ बच्चन, म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेणारी एक व्यक्ती. फक्त भारतातच नाही, तर परदेशातही बच्चन यांची लोकप्रियता. अशा या दशकातील महानायकासाठी आता साऱ्या जगातून चिंतेचा सूर आळवला जात आहे. (Amitabh bachchan)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बच्चन यांच्या प्रकृतीबाबत सर्वजण प्रश्न करत आहेत. कारण ठरतंय ते म्हणजे त्यांनी केलेलं एक ट्विट. 


'हृदयाचे ठोके वाढले आहेत... चिंता वाटतेय.... आशा करतो की सर्वकाही ठीक असेल', असं ट्विट त्यांनी केलं. सोबत हात जोडलेला आणि हार्ट शेप इमोजीही जोडला. 


हे ट्विट पोस्ट करण्यात आलं आणि चाहत्यांच्या चिंतेत भर पडली. अमिताभ बच्चन आजारी असल्याचं म्हणत चाहत्यांनू त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली. 


एकिकडे त्यांच्या ट्विटनं चिंता वाढवलेल्या असल्या तरीही दुसरीकडे त्यांचा ब्लॉग मात्र असं काही चिन्हं दाखवत नाही, जे पाहून चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. 


आपण कामात व्यग्र असल्याचं म्हणत ते या माध्यमातून आपण पूर्णपणे सुरक्षित असल्याचंही म्हणाले. 



असं असलं तरीही क्षणोक्षणी आता त्यांच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लक्ष देऊन आहेत. एका अभिनेत्याप्रती चाहत्यांचं असणारं हे निस्वार्थ प्रेमच नाही का....