मुंबई : हिंदी कलाजगतामध्ये काही सेलिब्रिटी कुटुंबांना कमालीची प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. अशाच कुटुंबांपैकी एक म्हणज बच्चन परिवार. महानायक अमिताभ बच्चन यांचं हे कुटुंब. संस्कृती आणि शिक्षणाची कास धरत या कुटुंबानं नावलौकिक मिळवलं. (Amitabh bachchan rekha jaya bachchan)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिथं बच्चन आणि त्यांच्या पुढच्या पिढीनंही या क्षेत्रात प्रसिद्धी मिळवली. अशा या कुटुंबावर कायमच सर्वांच्या नजरा खिळेलल्या असतात. 


किंबहुना बच्चन यांच्याशी ज्यांचं नाव जोडलं जातं त्यांचीही तितकीच चर्चा होते. अशीच प्रसिद्धी आणि चर्चा मिळाली ती म्हणजे अभिनेत्री रेखा यांना. 


अमिताभ बच्चन यांच्याशी रेखा यांचं नाव जोडलं गेल्यामुळे कायमच या जोडीवर सर्वांच्या नजरा खिळल्या. मुळात रेखा आणि बिग बींच्या नात्याचं समीकरण आजही अनेकांसाठी कुतूहलाचा विषय. 


जया बच्चन आणि रेखा यांचंही वेगळंच नातं. म्हणजे प्रत्यक्षात या दोघी सतत स्क्रीनसमोर आलेल्या नसल्या तरीही त्या ज्या ठिकाणी एकत्र दिसतात तिथंही चर्चांना उधाण येतं. 


असं घडलं मुकेश- नीता अंबानी यांच्या मुलाच्या लग्नात. आकाश आणि श्लोकाच्या लग्नानिमित्ताने बऱ्याच सेलिब्रिटींची हजेरी होती. यामध्ये बच्चन कुटुंबही मागे नव्हतं. 


या साोहळ्यासाठी जया बच्चन यांनी ऑफ व्हाईट आणि सोनेरी जरीकाम असणाऱ्या एका सिल्क साडीला पसंती दिली होती. तर, अमिताभ बच्चन यांनीही एका बंद गळा कुर्त्याला पसंती दिली होती. 


जया बच्चन यांच्या साड्यांची कायमच चर्चा होताना दिसते , अर्थात ती त्यावेळीही झाली. पण, या चर्चांना वेगळं वळण मिळालं जेव्हा तिथं रेखा यांची एंट्री झाली. 




सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा च्या कलेक्शनमधील हाफ अँड हाफ टोनमधील साडीला त्यांनी पसंती दिली होती. चमकदार अशा या साडीमुळं जेव्हा रेखा रेड कार्पेटवर आल्या त्यावेळी सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. 


जिथं आजापर्यंत जया बच्चन यांच्या साडीनं चर्चा रंगल्या तिथंच या चर्चांची जागा रेखा यांनी घेतली होती. 


त्यांच्याच थेट संपर्क झालेला नसला तरीही  पुन्हा एकदा काही जुने किस्से आणि या कलाकारांमध्ये असणाऱ्या नात्यानं नकळत डोकं वर काढल्याचं पाहायला मिळालं.