मुंबई : शालेय जीवनात अनेकदा असे काही कार्यक्रम आयोजित केले जातात ज्यांची संपूर्ण वर्षभर प्रत्येकालाच प्रतीक्षा लागून राहिलेली असते. यापैकीच एक कार्यक्रम म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलनाचा. सध्या अशाच एका वार्षिक स्नेहसंमेलनाची कलावर्तुळात चर्चा सुरु आहे. ही चर्चा आहे, बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मुलांच्या शाळेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची. ज्यामध्ये बिग बी Amitabh Bachchan  अमिताभ बच्चन यांची granddaughter नात,  Aaradhya आराध्या बच्चन हिच्या सुरेख सादरीकरणाने उपस्थित आणि खुद्द बिग बीसुद्धा भारावून गेले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला सबलीकरणाचा मुद्दा अधोरेखित करत, आराध्या बच्चन हिने एक छोटंसं भाषण सादर केलं. यामध्ये तिचं संवादकौशल्य आणि महिला सबलीकरणाविषयीच्या अतिशय सूचक आणि तितक्याच लक्षवेधी ओळी समाजातील प्रत्येक घटकाला विचार करण्यास भाग पाडत आहेत. 


आराध्याचं हे सादरीकरण, तिचा आत्मविश्वात पाहून खुद्द बिग बीसुद्धा तिची प्रशंसा करण्यावाचून राहिले नाहीत. 'कुटुंबाचा अभिमान, एकामुलीचा अभिमान, सर्व महिलांचा अभिमान.... आमची लाडकी आराध्या...', असं ट्विट करत अमिताभ बच्चन यांनी आराध्याचं एक सुरेख रुप सर्वांसमोर आणलं. 



शालेय कार्यक्रमातील या भाषणामध्ये आराध्याने म्हटलेल्या या ओळी होत्या, 'मी कन्या आहे. मी स्वप्न आहे... स्वप्न एका नव्या काळाचं. आपण एका अशा नव्या दुनियेत जागे होऊ जेथे मी सुरक्षित असेन, माझ्यावर प्रेम केलं जाईल, माझा आदर केला जाईल. हे एक असं जग असेल जेथे दुर्लक्ष किंवा आक्रस्ताळपणाने माझा आवाज दाबला जाणार नाही, तर जिथे समजुतदारपाने मला ऐकून घेतलं जाईल. एक असं जग जेथे आयुष्याच्या पुस्तकातून ज्ञान मिळेल, जे माणुसकीच्या नदीमध्ये स्वच्छंदपणे वाहत असेल'. 



आराध्याच्या या सादरीकरणाने फक्त बिग बीच नव्हे, तर तेथे उपस्थित असणारे इतर सेलिब्रिटी, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, शाहरुख खानसुद्धा भारावले होते. सोशल मीडियावरही बच्चन कुटुंबातील या चिमुकलीची अनेकांनीच प्रशंसा केली.