Annu Kapoor on Priyanka Chopra: ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आता हिंदी चित्रपटांमध्ये फार दिसत नाही. पण तिने बॉलिवूडमध्ये अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. प्रियांका चोप्रा आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. अनेक चित्रपटांमध्ये तिने इंटिमेट सीनही दिले आहेत. यामध्ये तिने केलेला '7 खून माफ' चित्रपटही होता. याच चित्रपटादरम्यान प्रियांका चोप्रा आणि अन्नू कपूर (Annu Kapoor) यांच्यात वाद झाला होता. प्रियांका चोप्राने अन्नू कपूर यांना शुटिंगदरम्यान किस करण्यास नकार दिला होता. दरम्यान आता इतक्या वर्षांनी अन्नू कपूर यांनी या वादावर मौन सोडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अन्नू कपूर यांनी नुकतीच एएनआयच्या पॉडकास्टरला हजेरी लावली होती. यावेळी अन्नू कपूर यांनी अनेक प्रश्नांवर दिलखुलास आणि स्पष्ट उत्तरं दिली. यावेळी त्यांनी प्रियांका चोप्रासह झालेल्या वादावरही भाष्य केलं. 


इंटिमेट सीनवरुन प्रियांका चोप्रासह झालेलं मतांतर यासंबंधी अन्नू कपूर यांना विचारण्यात आलं. तसंच तुम्हाला पटलं नाही तर अशा सीनला नकार देता का? असंही विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी सांगितलं की, "सात खून माफ चित्रपटात अनेक इंटिमेट सीन होते. विशाल भारद्वाज यांनी मला सांगितलं की, ती (प्रियांका चोप्रा) थोडी लाजत आहे. मी म्हटलं लाजत असेल तर सीन काढून टाका. उत्सव चित्रपटात तर मी रेखाची मालिश केली आहे. जेव्हा मी जुगार खेळून पळतो तेव्हा तर न्यूड सीनही दिले होते. आर के स्टुडिओत ते शूट झालं होतं". 


पुढे त्यांनी सांगितलं की, "मी विशालला सांगितलं की, जर तिला ठीक वाटत नसेल तर सीनच काढून टाक. त्यावर विशालने असं शक्य नाही सांगितलं. मी ठीक आहे सांगितलं. मी सेटवर मजामस्ती करणाऱ्यातला नाही. मी थोडा गंभीर आहे. मी शॉट दिले. पण सोलो शॉट झाला तेव्हा तो पाहून सिद्धार्थ नावाचा एक असिस्टंट आला आणि म्हणाला सर तुम्हाला मानलं. एवढे सीन केले तेव्हा काही वाटलं नाही आणि आता सेक्स सीन केल्यावर मानलं म्हणतोस".


"सेक्स आणि हिंसा तुम्हाला नेहमीच आकर्षित करतं. मग तुम्ही कुठलेही असाल. प्रियांका चोप्राने मला किस करण्यास नकार दिल्याचं सांगण्यात आलं. मी म्हटलं ठीक आहे, पण त्यावरुन फार गदारोळ झाला होता. ती काय म्हणाली मला माहिती नव्हतं. पण मी म्हटलं, जर मी हिरो असतो तर प्रियांका चोप्राला काही आक्षेप नसता. हिरोला किस करण्यावर कोणत्याच अभिनेत्रीला आक्षेप नसतो. हिरो मी आहे, पण ना चेहरा, ना पर्सनॅलिटी. त्यामुळे समस्या आहे. हीच गोष्ट तिच्या मनाला लागली," असा खुलासा अन्नू कपूर यांनी केला. इंटिमेट सीन करताना मी मस्करी करत नाही. उलट त्या मुलींना मदत करतो असंही त्यांनी सांगितलं.