मुंबई : बॉलिवूडमध्ये काही कलाकार हे त्यांच्या कलेसाठी ओळखले जातात. त्यासोबतच काही कलाकार हे त्यांच्या केलसोबतच समाजाप्रती असणाऱ्या काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या निभावण्यासाठीही ओळखले जातात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण ज्या समाजात वावरतो, त्या समाजातील प्रत्येक घटकाशी आपली बांधिलकी असते. कोणा एका घटकाप्रती काही जबाबदाऱ्या असतात. त्या जाणत त्या घटकांसाठीही काही योगदान देण्याकडे अनेकांचा कल असतो. बऱ्याच संस्थांपासून अगदी कलाकारांपर्यंत अनेकजण यात योगदान देतात. काही कलाकार तर नित्यनियमाने अशा कामांमध्ये हिरीरिने सहभागी होताना दिसतात. त्यापैकीच एक नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांचं. 


कायमच ठराविक मुद्द्यांवर आपली ठाम भूमिका मांडणाऱ्या अभिनेता अनुपम खेर यांनी नुकतच त्यांच्या काही खास मित्रांच्या जीवनात आनंदांच्या क्षणांची उधळण केली आहे. ज्याविषयी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून माहिती मिळाली. खेर यांचे खास मित्र जरा जास्तच खास होते. हे त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओतून कळलं. मुंबईच्या रस्त्यांवर असणाऱ्या, वावरणाऱ्या आणि सहसा काही गोष्टींना मुकणाऱ्या काही लहान मुलांना अनुपम खेर यांनी मुंबईतील 'सन-एन-सँड' या आलिशान हॉटेलमध्ये 'ब्रंच'साठी (खाण्यासाठी) नेलं. 



अतिशय सुखद अशा या अनुभवाविषयी सांगत या मुलांसोबत वेळ व्यतीत करत आपण गाणी गायली, त्यांच्यासोबत त्या क्षणांचा मनमुराद आनंद लुटल्याचं खेर यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या एका मुलाने त्यांच्या कानात येऊन, काका बिल जास्त नाही ना झालं? असा प्रश्न केला. त्या मुलाचा प्रश्न ऐकून खेरही भारावले. मुख्य म्हणजे ते काही क्षण त्या मुलांच्या जीवनात आनंदाची उधळण करुन गेल्याचंच समाधान त्यांनी येथे व्यक्त केलं.