मुंबई : मुंबई ड्रग्स केस (Mumbai Drugs Case) प्रकरणामध्ये अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा, आर्यन खान याचं नाव आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. नाव चर्चेत येण्यास कारणीभूत ठरत आहे न्यायालयाचा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या घडीला समोर आलेल्या माहितीनुसार आता (Aryan khan)ला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर होण्यापासून मुभा देण्यात आली आहे. 


आर्यनच्या वतीनं यासंबंधीची याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेची सुनावणी करताना न्यायालयानं हा आदेश दिला. 


मुंबई ड्रग्ज केस प्रकरणामध्ये आर्य़नला मोठा दिलासा मिळाला आहे असंच सध्या सांगण्यात येत आहे. 


28 ऑक्टोबरला आर्यनला न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला होता. ज्यानंतर दर शुक्रवारी त्यानं एनसीबी कार्यालयात हजर राहणं अपेक्षित होतं. पण, आता मात्र मुंबई न्यायालयानं आर्यनला दिलासा दिला आहे. 


असं असलं तरीही दिल्ली एसआयटीनं आर्यनला समन्स पाठवल्यास मात्र त्याला चौकशीसाठीहजर रहावं लागणार आहे. शिवाय आर्यन मुंबईतून बाहेर जाऊ इच्छित असल्यास त्याला तपास अधिकाऱ्यांना यासंदर्भात पूर्वसूचना देणं बंधनकारक असेल. 


आर्यनतर्फे मांडण्यात आला महत्त्वाचा मुद्दा 
आर्यननं आपल्या याचिकेमध्ये नाराजीचा सूर आळवत एनसीबी कार्यालयाच जाण्यापूर्वी माध्यमांच्या अनेक प्रतिनिधींची गर्दी असते. अशा वेळी पोलिसांना आर्यनला एनसीबी कार्यालयात अतिशय वेगानं न्यावं लागतं. 


आपल्याला याचीच अडचण असल्याचं त्यानं याचिकेमध्ये म्हटलं होतं. ज्यावर उच्च न्यायालयानं बुधवारी सुनावणी केली.