बोगस डॉक्टर म्हणून एकेकाळी आसरा घेणारा अभिनेता आज म्हणजो, `दौलत है, शोहरत है, इज्जत है`
काही कलाकारांनी फार कमी वयातच त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली, तर काहींनी उशीरा सुरुवात करुनही प्रेक्षकांवर चांगलीच पकड मिळवली
मुंबई : मनोरंजन विश्वात कोणत्याही कलाकाराचं उदाहरण घ्या, कमीत कमी संघर्षापासून जास्तीत जास्त संघर्ष केलेली अनेक नावं आणि अनेक चेहरे तुमच्यासमोर उभे राहतील. काही कलाकारांनी फार कमी वयातच त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली, तर काहींनी उशीरा सुरुवात करुनही प्रेक्षकांवर चांगलीच पकड मिळवली.
अशा या कलाजगतामध्ये एक अभिनेता असाही आहे, ज्याला संघर्षाच्या दिवसांमध्ये इतरांची फसवणूक करावी लागली होती. नशीबानं त्याचीही परीक्षा घेतली होती. एका कार्यक्रमादरम्यान या अभिनेत्यानं माहिती देत संघर्षाच्या दिवसांना उजाळा दिला.
हा अभिनेता, आता सधन असला तरीही तो भूतकाळ मात्र विसरलेला नाही. सध्या आलिशान बंगल्यात राहणारा, महागड्या कारमध्ये फिरणारा हा अभिनेता आहे, आयुष्मान खुराना. (Bollywood Actor Ayushmann Khurrana Struggle once lived as a doctor)
आयुष्मान जेव्हा सुरुवातीच्या दिवसांमध्ये मुंबईत आला, तेव्हा त्याच्यासाठी काहीच सोपं नव्हतं. खिशात पुरेसे पैसेही नव्हते की, स्वतंत्र घर घेता येईल. शेवटी त्यानं एका मित्राची मदत घेतली. आयुष्मानचा एक मित्र वैद्यकिय महाविद्यालयातील वसतीगृहात अर्थात हॉस्टेलमध्ये राहत होता.
शेवटी आयुष्माननं त्याच्या मित्रासोबत वसतीगृहातच राहण्यासाठी मदत मागितली. तेव्हा आयुष्मान डॉक्टरांचा कोट घालूनच तिथं वावरत होता. वॉचमॅनलाही तो कुणी शिकाऊ डॉक्टर आहे, असंच वाटत होतं. अशी फसवणूक करुन तो अनेक वर्षे तिथं राहिला होता.
आयुष्मान त्यावेळी फसवणूक करुन राहत होता, आज मात्र त्याचा गुरुग्राम येथे आलिशान बंगला आहे. मेहनतीच्या बळावर त्यानं जे यश संपादन केलं आणि जी कमाई केली, त्याचंच प्रतीक म्हणजे हे भव्य घर.