मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) कायमच त्याच्या विनोदी शैलीमुळं प्रसिद्धीझोतात असतो. कलाविश्वात प्रवेश करण्यापासून सातत्यानं प्रसिद्धीझोतात राहण्यापर्यंतचा त्याचा प्रवास तसा सोपा नव्हता. पण, त्यातही त्यानं आपलं वेगळेपण सिद्ध करत अपेक्षित यश मिळवलं. स्टँड अप कॉमेडीला (Standup Comedy) वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवणाऱ्या कपिलनं त्याच्या खासगी आयुष्यालाही या साऱ्यामध्ये कायमच प्राधान्यस्थानी ठेवलं. पण, आता मात्र त्याला कुठेतरी पत्नीचा विसर पडताना दिसत आहे. (Bollywood Actor comedian Kapil Sharma fell in love with glamorous neighbour srishty rode)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिलचं एकंदर वागणं, पाहता पत्नीच्या (Kapil Sharma Wife) नजरेआड त्याचं काय सुरुये हे पाहून तुम्हालाही हादराच बसेल. कारण, आता म्हणे तो शेजारणीच्या प्रेमात पडलाय. साध्यासुध्या नव्हे, ग्लॅमरस शेजारणीच्या प्रेमात. 


कपिलच्या वैवाहिक आयुष्यात नेमकं काय सुरुये? असे आणि यासारखे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर, तसं नाहीये. कपिल शेजारणीच्या प्रेमात पडलाय खरा, पण ती त्याची Reel  'पडोसन' आहे. 


नुकताच कपिल शर्मा याच्या कार्यक्रमाचा एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या (Promo Video) प्रोमोमध्ये त्याच्या शोमध्ये असणाऱ्या मोहल्ल्यामध्ये एक नवी महिला येताना दिसते. तिचं नाव, गझल. ही भूमिका साकारतेय अभिनेत्री सृष्टी रोडे. 



गझलचं सौंदर्य पाहून कपिल तिच्या अवतीभोवतीच फेऱ्या टाकताना दिसत आहे. तिच्या सौंदर्यावर तो असा काही भाळला आहे, की पाहणाऱ्यांनाही धक्काच बसतोय. बरं, या शोमधील शेजारणीचं रुपही इतकं लक्ष वेधणारं, की मोहल्ल्यात असणारी इतर मंडळी (कलाकार) बेभान झाल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.