मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील रॉकस्टार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे फरहान अख्तर. गायन, संगीत दिग्दर्शन, चित्रपट दिग्दर्शन, अभिनय अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या फरहान अख्तरच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होतच आहे. मुख्य म्हणजे सेलिब्रिटींमध्येही त्याचे चाहते आहेत. पण, सध्या मात्र फरहानला त्याची सर्वात जवळची चाहती भेटली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाहती म्हणण्यापेक्षा त्याला प्रेमाची, हक्काची अशी व्यक्तीच भेटली आहे. खुद्द फरहाननेच सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट करत जणू याविषयीची माहिती दिली. 



काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री, मॉडेल, गायिका शितबानी दांडेकर हिने फरहानसोबतचा फोटो पोस्ट केल्यामुळे या दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं होतं. अचर्थात ते उधाण शमलंही. पण, आता खुद्द फरहाननेच हृदयाच्या चिन्हासह शिबानीचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 


त्याने पोस्ट केलेला हा फोटो पाहता एका अर्थी तो या नात्याची कतबुलीच देत असल्याचं स्पष्ट होत आहे. 


सेलिब्रिटी त्यांच्या नात्याची कबुली देऊन विवाहबंधनात अडकत असतानाच फरहानने केलेली ही पोस्ट त्याच्या नात्यातील पुढचं पाऊल आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.