मुंबई : बिहारच्या राजकारणावर बेतलेला दशहारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये गोविंद नामदेव आरजेडीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची भूमिका साकारणार आहेत. १९९० मध्ये व्हिलनच्या भूमिका गाजवलेले गोविंद नामदेव आता लालूप्रसाद यादव यांच्या भूमिकेमध्ये दिसतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटामध्येही मी व्हिलनच्याच भूमिकेत असणार आहे. बिहारच्या परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटामध्ये माझी भूमिका लालूप्रसाद यादव यांच्याशी मिळती जुळती आहे, असं गोविंद नामदेव म्हणालेत. या चित्रपटामध्ये 'चारा'ही आहे, त्यामुळे ही भूमिका लालूप्रसाद यादव यांच्यासारखी आहे, हे प्रेक्षक ओळखतील, असं वक्तव्य गोविंद नामदेव यांनी केलं आहे.