Hollywood Intimate Scene: इंटिमेट सीनची जोड असणाऱ्या बऱ्याच कलाकृती चर्चेत राहिल्या. सध्याच्या वेब सीरिज आणि चित्रपटांमध्येही अशा प्रकारच्या दृश्यांचा भरणा पाहायला मिळतो. आता इंटिमेट सीन, किंवा काही प्रणयदृश्यांबद्दल आणखी वेगळं सांगण्याची गरज नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कथानकाची गरज पाहता अशा प्रकारच्या दृश्यांना दिग्दर्शकाकडून प्राधान्य देण्यात येतं. किंबहुना काही अभिनेत्री चित्रपटामुळे नव्हे, तर त्यांच्या इंटिमेट सीनमुळं चर्चेत येतात. पण, कधी कोणी अभिनेता अशा सीनसाठी चर्चेत आल्याचं तुम्ही पाहिलंय ? 


दिवंगत अभिनेता इरफान खान, याचं नाव एका इंटिमेट सीनमुळंही बरंच चर्चेत आलं होतं. एका मुलाखतीदरम्यान, त्यानं या सीनच्या चित्रीकरणादरम्यानचा किस्सा सांगितला. 


ज्यावेळी इंटिमेट सीन करायचाय, मग कुर्ता/ कपडे काढ असं इरफानला दिग्दर्शकानं सांगितलं. यावर त्यानं स्पष्ट नकार दिला. 'तू झोपतोयस आणि कुर्ता नाही काढणार?', असा प्रश्न त्या दिग्दर्शकानं इरफानला केला. 


आमच्याकडे कपडे काढून झोपत नाहीत, कपडे घालूनच झोपतात. मी इथे भारतीय पात्र साकारतोय, तर कुर्ता घालूनच मी हा सीन करेन असं त्यानं हॉलिवूड दिग्दर्शकाला सांगितलं. 



इरफानचा हा किस्सा तो आज आपल्यात नसला तरी तितकाच चर्चेत असतो. मुळात त्याचा कुर्ता न काढण्यामागे कोणंही दुसरं कारण नव्हतं, त्याला विवस्त्र होण्यास संकोचलेपणा वाटत होता. त्यामुळेच हा सर्व बतावण्यांचा घाट त्यानं घातला होता.