मुलगा कोट्यवधींचा मालक, तरीही जॉन अब्राहमच्या आई-वडिलांची ही परिस्थिती का?
तुमचेही आई-बाबा हेच सांगत असावेत
मुंबई : प्रसिद्धीझोतात आल्यानंतर आणि कारकिर्दीत योग्य वेळी योग्य संधी निवडत त्या अनुशंगानं काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी यशाची शिखरं गाठली आहेत. सुरुवातीला त्यांनी केलेला संघर्ष अर्थातच वाखाणण्याजोगा आहे. अशाच कलाकारांमध्ये अभिनेता जॉन अब्राहम याचं नाव घेतलं जातं. (John Abraham)
जॉनचं नाव घेतलं की फिटनेस, पिळदार शरीरयष्टी, देखणं रुप असंच चित्रं उभं राहतं.
एका चित्रपटासाठी जॉन जवळपास 15 कोटी रुपये इतकं मानधन घेतो. सध्या त्याच्या एकूण संपत्तीचा आणि वार्षिक उत्पन्नाचा आकडाही थक्क करणारा.
मुलगा तिथं प्रसिद्धी आणि श्रीमंतीचा उपभोग घेतानाच जॉनचे आईवडील मात्र वेगळं आयुष्य जगत आहेत.
सर्वसामान्य नागरिकाच्या रुपातच त्याचे आईबाबा या जगात वावरत आहेत.
दळणवळणाच्या सार्वजनिक सुविधांनी प्रवास करत आहेत. बस, ऑटोनं सर्रास विविध ठिकाणी जात आहेत. आता तुम्ही म्हणाल असं नेमकं का?
जॉनच्या आईवडिलांना साधं राहणीमान आवडतं, या एका कारणामुळंच ते आलिशान कार किंवा वाहनांतून नव्हे, तर ऑटोरिक्षा आणि बसने प्रवास करत आहेत.
कितीही मोठं झालो तरीही आपले पाय कायम जमिनीवरच हवेत, परिस्थितीची आपल्याला जाणीव हवी हाच त्यांच्या असं करण्यामागचा हेतू असतो.
जॉनही अनेकदा सर्वसामान्यांप्रमाणेच सायकलनं प्रवास करण्यापासून रस्त्यानं चालणाऱ्या चाह्यांशीही संवाद साधताना दिसतो. त्याच्यामध्ये असणारे हे स्वभावगुण आई-वडिलांच्या संगोपनातूनच आले असणार यात वाद नाही.
बी- टाऊनच्या सेलिब्रिटी गेटटुगेदरला जाणाऱ्यांपैकी जॉन नाही. गेलाच तर, साधं टी शर्ट, जीन्स आणि फ्लोटर्स असा त्याचा लूक.
'तू पार्टीला शूज वगैरे का घालत नाहीस', असं विचारलं असता स्लिपर, फ्लोटरमध्ये मला फार सहजपणे वावरता येतं, इतकं सोपं आणि खरं कारण तो पुढे करतो.