एकेकाळी रिक्षामध्ये फिरायचा `हा` सुपरस्टार, रागाच्या भरात खरेदी केली लेम्बोर्गिनी
बॉलिवूडमधील हा सुपरस्टार कधीकाळी अवॉर्ड शोसाठी रिक्षामधून प्रवास करत होता. मात्र, रागाच्या भरात त्याने खरेदी केली लॅम्बोर्गिनी. कोण आहे तो अभिनेता? जाणून घ्या सविस्तर
Kartik Aaryan : कार्तिक आर्यनने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. यामधून त्याने करोडोंची कमाई केली आहे. हिट चित्रपटांनंतर तो काही निर्मात्यांचा आवडता अभिनेता ठरला आहे. नुकतेच कार्तिक आर्यनने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. त्याने त्याच्या करिअरमध्ये पहिली कार 35 हजार रुपयांना खरेदी केली होती. त्यानंतर त्याने रेंज रोव्हर सारख्या कार खरेदी करण्यास सुरुवात केली.
कार्तिक आर्यन आज देखील त्याच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. सध्या तो कोटींमध्ये कमाई करत आहे. मात्र, याआधी कार्तिक आर्यन हा रिक्षाने प्रवास करत होता. कार्तिकने अवघ्या 35 हजार रुपयांमध्ये पहिली कार खरेदी केली होती. आज त्याच्याकडे अनेक मोठ्या कार आहेत.
कार्तिक आर्यनने केला मोठा खुलासा
अभिनेता कार्तिक आर्यनने एका मुलाखतीत एक मोठा खुलासा केला होता की, मी सेकेंड हैंड कार खरेदी केली होती. ज्या कारची किंमत 35 हजार रुपये होती. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा त्याला त्याच्या पहिल्या लक्झरी कारबद्दल विचारले तर तो म्हणाला की, लैम्बॉर्गिनी कार घेण्याआधी मी फक्त जुन्या कार खरेदी करायचो कारण ते मला परवडत होते. पण आज माझ्याकडे नवीन रेंज रोव्हर कार आहे. त्याचबरोबर मॅकलॅरेन, मिनी कूपर आणि उरुस कार आहेत.
रागाच्या भरात खरेदी केली रेंज रोव्हर कार
माझ्या आयुष्यातील एक काळ असा होता की मला गाड्या परवडत नव्हत्या. मी स्वत: साठी कोणतेही वाहन घेऊ शकलो नाही. याच गोष्टीचा मला इतका राग आला की मी माझ्या स्वप्नातील सर्व गाड्या विकत घेईन आणि गॅरेज गाड्यांनी भरवून टाकेन. जेणेकरून मला कधी कारची कमी भासू नये. कधी-कधी मी नाराज असताना कार खरेदी करतो. मला हे कळत पण नाही. मला नाही माहिती की मी भविष्यात कोणत्या कार खरेदी करू शकतो. कारण माझ्याकडे पार्किंगसाठी जागा राहिलेली नाही.
कार्तिक आर्यनने कपिल शर्माच्या शोमध्ये एक खुलासा केला होता की, रेड कार्पेट इवेंट्स आणि अवॉर्ड शोसाठी रिक्षामधून जात होतो. त्यानंतर कार्तिकने एक जुनी कार खरेदी केली. जर आज विचार केला तर कार्तिक आर्यनने 'भूल भुलैया 2' या चित्रपटामध्ये अक्षय कुमारची जागा घेतली आणि अभिनेत्याला टक्कर दिली. आता कार्तिकचा 'भूल भुलैया 3' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांमध्ये या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज होणार आहे.