मुंबई :  बॉलिवूड अभिनेता milind soman मिलिंद सोमण हा कायमच त्याच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला गेला आहे. मिलिंदचं राहणीमान असो, त्याच्या कलाविश्वातील वावर असो किंवा मॉडेलिंग क्षेत्रावर त्यानं गाजवलेलं अधिराज्य असो. प्रत्येक बाबतीत तो कायमच अग्रेसर असल्याचं पाहिलं गेलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असा हा अभिनेता अंकिता कोनवार हिच्याशी विवाहबंधनात अडकल्यापासून तर, चाहत्यांना कपल गोल्स देऊ लागला आहे. मिलिंद आणि अंकिताचे हे कपल गोल्स जरा हटके आहेत. कारण, प्रेमाच्या आणाभाकांपुरताच सीमीत न राहता ही जोडी शारीरिक सुदृढता, पर्यावरणाचं महत्त्वं, कलेचं महत्त्वं यांची सांगड घालत त्या माध्यमातून अनोखे आदर्श सर्वांपुढं प्रस्थापित करत आहे. 


सतत काहीतरी नवं करण्याच्या उद्देशानंच विचार करणाऱ्या मिलिंदनं यावेळी त्याच्या प्रिय पत्नीसाठी एक मोठा निर्णय घेतल्याचं कळत आहे. किंबहुना त्यानं केलेली सोशल मीडिया पोस्टच याबाबतची ग्वाही देऊन जात आहे. 'अखेर..... दाढीवाला शेतकरी.... अंकिताला हवा होता अगदी तसाच', या शब्दांत त्यानं एक व्हिडिओ आणि काही फोटो शेअर केले आहेत. 



 


शेअर करण्यात आलेल्या या फोटोंमध्ये तो घरातच उगवलेल्या एका छोटेखानी शेतामध्ये उगवलेली भाजी तोडताना दिसत आहे. आपणच आपल्या हातांनी उगवलेली ही भाजी तो मोठ्या कौतुकानं सर्वांना दाखवतही आहे. दैनंदिन जीवनशैलीत कायमच लहान कृतींतून आनंद मिळवणाऱ्या मिलिंदनं पत्नीच्या आऩंदासाठी म्हणून घेतलेलं शेतकऱ्याचं रुप चाहत्यांनाही भावलं आहे. त्याच्या पोस्टवर करण्यात आलेल्या असंख्य कमेंट्स हेच सांगून जात आहेत. काय मग, हा दाढीवाला शेतकरी तुम्हाला कसा वाटला?