मुंबई : वेब सीरिजच्या निमित्तानं अनेक विषय मोठ्या समर्पकपणे आणि तितकाच धोका पत्करत साकारण्यात येत आहेत. मुख्य म्हणजे प्रेक्षकांचीही याला स्वीकृती मिळत आहे. पण, असाही एक वर्ग आहे, ज्यानं याकडे कला म्हणून पाहण्यापेक्षा त्यामधील आक्षेपार्ह, अश्लील गोष्टींकडेच सातत्यानं लक्ष वेधलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलाकारांचा अनुभव, पात्र साकारण्यासाठीची त्यांची समर्पकता आणि त्यातही त्यांनी जीव ओतून उभी केलेली कलाकृती, या पलीकडेही दिसणारं दृश्य किती अश्लील आहे यावरच जास्त भर दिला गेला. 


'सेक्रेड गेम्स' या सीरिजमधील दृश्यांबाबतही असंच काहीसं झालं. यातील एका दृश्याची बरीच चर्चा झाली. अर्थात तीसुद्धा संमिश्र. 


सीरिजमध्ये अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी आणि पंकज त्रिपाठी यांच्यामध्ये एक इंटिमेट सीन दाखवण्यात आला होता. 



हा सीन अनेक चर्चांना वाव देऊन गेला. कोणालाही अपेक्षा नव्हती की या सीरिजमध्ये असं एखादं दृश्य असेल. ज्यामुळं चर्चा आणखीच फोफावत गेल्या. 



मीम्सपासून ते अगदी फोटोंपर्यंत या दृश्यांची झलक दिसली. फक्त हे एकच दृश्य नव्हे, तर इतरही बोल्ड दृश्यांची प्रेक्षकांमध्ये चर्चा झाली. 



इथं महत्त्वाचा मुद्दा असा, की या दृश्यांकडे कलाकृती म्हणून पाहणारे कमी आणि विचित्र दृष्टीकोनातून पाहणारे डोळे जास्त होते.