Parvin Dabas Accident: 'खोसला का घोसला' फेम बॉलिवूड अभिनेता परवीन डबास (Parvin Dabas) रस्ते अपघातात जखमी झाला आहे. मुंबईतील वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात (Holy Family Hospital) त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याला सध्या आयसीयूत (ICU) ठेवण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री हा अपघात झाला. परवीन डबाससह सध्या त्याची पत्नी प्रिती झांगियानी रुग्णालयात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परवीन , आर्म रेसलिंग Pro Panja League चा सह-संस्थापक आहे. Pro Panja League ने अधिकृत निवेदन जारी करत माहिती दिली आहे की, प्रो पंजा लीगचे सह-संस्थापक परवीन डबास सध्या रुग्णालयात दाखल आहेत. शनिवारी सकाळी एका दुर्दैवी अपघातानंतर त्यांना वांद्रेमधील होली फॅमिली रुग्णालयाच्या आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या कठीण प्रसंगी आमच्या संवेदना प्रवीण आणि त्यांच्या कुटुंबासह आहेत. 


प्रो पंजा लीग सध्या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. आम्ही सतत तुम्हाला अपडेट देत राहू. आम्ही चाहत्यांना आवाहन करत आहोत की, या कठीण प्रसंगी त्यांनी परवीन आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या गोपनीयतेचा आदर करावा. परवीन लवकर बरे व्हावेत यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. 


परवीन डबासने रागिनी एमएमएस 2, माय नेम इज खानसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'मेड इन हेवन' या वेब सीरिजमध्येही त्याने काम केलं आहे. अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झालेल्या 'शर्मा जी की बेटी' चित्रपटात तो दिसला होता. 


प्रिती झंगियानीसह लग्न


परवीन डबास 50 वर्षांचा आहे. 2008 मध्ये त्याने अभिनेत्री प्रिती झांगियानीशी लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत. प्रवीण आणि प्रितीची भेट 'विद लव...तुम्हारा' च्या सेटवर झाली होती. शुटिंगदरम्यान ते प्रेमात पडले आणि नंतर लग्न केलं. दोघांनी Swen Entertainment नावाची कंपनी सुरु केली. बिझनेस करताना आमच्यात अनेक गोष्टींवरुन भांडणं होतात. मात्र नंतर सर्व काही सुरळीत होतं असं प्रितीने एका मुलाखतीत सांगितलं होतं.