मुंबई : बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लग्नसराई सुरु झाली आहे. अनेक मोठमोठे आणि तितकेच लोकप्रिय कलाकार त्यांच्या जीवलगांसह लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. एकिकडे विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे आता, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्याही लग्नासाठीचं ठिकाण निश्चित झाल्याची बातमी मिळत आहे. (Ranbir Alia wedding)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या बऱ्याच काळापासून रणबीर आणि आलियाचा विवाहसोहळा चर्चेत होता. अखेर म्हणे या जोडीला लग्नाचा मुहूर्त मिळाला आहे. 


कोरोना काळामुळं लांबलेलं आलिया आणि रणबीरचं लग्न अखेर पार पडत असल्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पाहायला मिळत आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार विराट आणि अनुष्काप्रमाणेच बी टाऊनची ही जोडी, म्हणजे आलिया- रणबीर डेस्टिनेशन वेडिंगसाठी इटलीला पसंती देत असल्याचं म्हटलं जात आहे. 


अतिशय कमी पाहुण्यांच्या उपस्थितांमध्ये हा विवाहसोहळा पार पडेल. ज्यामध्ये कुटुंब आणि काही खास मित्रमंडळींचा समावेश असेल. 


डिसेंबर महिन्यामध्ये रणबीर त्याचा आगामी 'अॅनिमल' या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करणार होता. पण त्यानं हे सर्व वेळापत्रक 2022 जानेवारी महिन्यापर्यंत ढकललं आहे.