Ranbir- Alia Wedding : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाचे फोटो पाहता पाहता इतके व्हायरल झाले की स्टेटसपासून अगदी प्रत्येकाच्या फोन गॅलरीमध्येही याच फोटोंनी घर केलं. सर्व स्तरांतून आलिया आणि रणबीरवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुटुंबीय, मित्रपरिवार आणि अगदी चाहत्यांनी या जोडीला शुभेच्छा दिल्या. आलियाच्या कुटुंबीयांसाठी हा क्षण अतिशय भावनात्मक होता. कारण, त्यांची लाडाची लेक आता तिच्या सासरी जाणार होती. 


आलियाची आई, निर्माता दिग्दर्शक आणि आलियाचा खास मित्र करण जोहर आणि अगदी तिचा जवळचा मित्र अयान या क्षणी भावनिक झाले. यातच एक व्यक्ती असाही होता ज्याचं आलियाशी रक्ताचं नातं नसतानाही त्यानं गेली 20 वर्षे तिची काळजी घेतली. 


इवल्याच्या आलियाचा हात धरून तिच्या संरक्षणाची जबाबदारी घेणारा हा व्यक्ती म्हणजे तिचा बॉडीगार्ड, सुनील. 


आलियाचं लग्न होताना पाहून तो इतका गहिवरला, की सोशल मीडियाचा आधार धेत त्यानं भावनांना वाट मोकळी करुन दिली. 


तुला नवरी म्हणून पाहताना माझं मन भरुन आनंदान भरून गेलंय असं तो म्हणाला. यावेळी या नि:स्वार्थ नात्यानं सर्वांचं मन जिंकलं. 






तिथं रणबीरचा बॉडीगार्ड युसूफ इब्राहिम यानंही या नव्या जोडीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. कपूर कुटुंबीयांचे फोटो व्हायरल होत असतानाच सुनील आणि युसूफ या दोघांनीही चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला. तो म्हणजे त्यांच्या निस्वार्थ वृत्तीनं... आणि आपलेपणानं....