Ranbir Kapoor summoned by ED : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर अडचणीत सापडला आहे. रणबीरला अंमलबजावणी संचलनालयानं चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, ऑनलाईन बेटिंग प्रकरणाशी संबंधित त्याची चौकशी केली जाऊ शकते. एवढेच नव्हे, तर अभिनेता आणि त्याची पत्नी आलिया भट्ट हिला देखील समन्स बजावण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. त्याला महादेव अॅप प्रकरणात हे समन्स बजावण्यात आलं आहे. रणबीरला 6 ऑक्टोबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. 


द महादेव बूक ॲप 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द महादेव बूक ॲप हे एक ऑनलाईन बेटिंग प्लॅटफॉर्म आहे. मनी लॉंड्रिंग प्रकरणात ईडी आणि पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांची ही कंपनी दुबईमधून कार्यरत होती. त्यांनी कथितपणे ऑनलाइन बूक बेटिंग ॲपचा वापर नवीन वापरकर्त्यांची नोंदणी करण्यासाठी, वापरकर्ता आयडी तयार करण्यासाठी आणि बेनामी बँक खात्यांच्या स्तरित वेबद्वारे पैसे लाँडर करण्यासाठी करत होती, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. हा संपूर्ण घोटाळा यंदाच्या वर्षी म्हणजेच फेब्रुवारी 2023 मध्ये उघडकीस आला आहे. तर त्याचं कारण हे सौरभ चंद्राकरचं लग्न ठरलं होतं. त्यानं युएईमध्ये लग्न केलं असून त्यासाठी त्यानं तब्बल 200 कोटी खर्च केले होते. सौरभचं संपूर्ण कुटुंब हे नांदेडवरून युएईला प्रायव्हेट जेटनं आले होते. त्या प्रकरणानंतर तो ईडीच्या रडारवर आला होता. त्यानंतर ईडीनं अनेक सेलिब्रिटी मॅनेजर्सना मुंबई आणि दिल्लीत समन्स बजावलं. त्यातून ई़डीनं 2.50 कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे.


सौरभ चंद्राकरच्या लग्नात सेलिब्रिटींची हजेरी


ईडीनं दिलेल्या माहितीनुसार, या 200 कोटींमधील सौरभनं 112 कोटी हे त्याचं लग्नाचा कार्यक्रम मॅनेज करणाऱ्या कंपनीला हवाला मार्फत दिले आणि जवळपास 42 कोटी हे रोख दिले. हे 42 कोटी हॉटेल्सची बूकिंग करण्यासाठी वापरण्यात आले होते. सौरभ चंद्राकरच्या लग्नात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यात टायगर श्रॉफ, सनी लिओनी, नेहा कक्कर, विशाल दादलानी, भारती सिंग, भाग्यश्री, क्रिती खरबंदा, एली अवराम, नुसरत भरुच्चा, आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान, अली असगर, कृष्णा अभिषेक आणि सुखविंदर सिंग हे सेलिब्रिटी आहेत. नेहा कक्करनं तर या लग्नात गाणी गायली होती. 


हेही वाचा : मुख्यमंत्र्यांनाही 'या' मराठमोळ्या चित्रपटाची उत्सुकता, ट्विट करून दिल्या शुभेच्छा


दरम्यान, ईडीने महादेव ऑनलाइन बेटिंग प्रकरणी 8 अंगडिया कार्यालयांवर धाड टाकत 417 कोटींची संपत्ती जप्त केली आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिली आहे. 'महादेव अॅपशी संबंधित कोलकाता, भोपाळ, मुंबईसारख्या शहरातील मनी लाँडरिंग नेटरवर्किंगवर धाड टाकली. यावेळी मोठ्या प्रमाणात पुरावे सापडले असून, 417 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे,' अशी माहिती ईडीने दिली होती.