मुंबई : बॉलिवूड चित्रपट किंवा एकंदरच एका कलाकाराची कोणतीही भूमिका आवडली, की त्या भूमिकेसाठी अमुक एका कलाकारासोबतच ती साकारण्यासाठी त्याने घेतलेले कष्टही प्रशंसेस पात्र ठरतात. आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेनुसार स्वत:मध्ये महत्त्वाचे बदल करण्याकडे सेलिब्रिटींचा कायमच कल असतो. दीपिका म्हणू नका, रणवीर म्हणू नका किंवा मग खिलाडी अक्षय कुमार. प्रत्येक कलाकार या वाटेवर निघाल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतं ते म्हणजे या सेलिब्रिटींचं डाएट, अर्थात त्यांच्या आहाराच्या सवयी.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमुक एका डाएटच्या अनुशंगाने त्यानुसार आहारही घेण्यास कलाकार मंडळी प्राधान्य देतात. ज्यामध्ये त्यांची भूक भागवत वेळप्रसंगी त्यांच्या आवडीनिवडींकडेही लक्ष देण्यासाठी सज्ज आहे, PoD supply ही खाद्यपदार्थ पुरवणारी सर्व्हिस. असं म्हटलं जातं की कबीर खान दिग्दर्शित '`83' या चित्रपटासाठीसुद्धा रणवीर सिंग याने PoD supplyला पसंती दिली होती. 'मिड- डे'च्या वृत्तानुसार या चित्रपटात एक सुदृढ खेळाडू साकारण्यासाठी म्हणून रणवीरला प्रोटीनचं प्रमाण जास्त असणारं डाएट देण्यात आलं होतं. ज्यानुसार त्याच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असेल हे ठरवण्यात आलं होतं. एक खास शेफ त्याच्या आहाराची काळजी घेण्यासाठी म्हणून लंडन येथे रवाना झाला होता. 


गेल्या सहा वर्षांपासून रणवीर PoD supplyशी जोडला गेला आहे अशी माहिती सहसंस्थापक अनमोल सिंघल यांनी दिली होती. PoD supplyकडून पुरवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये रणवीरला 'हॅलेपिनो एँड क्रिस्प बेकन ऑम्लेट' हा आवडीचा पदार्थ. त्याशिवाय, ओट्स, अंडी, मिक्स्ड नट्स आणि ताज्या बेरीज यांचं एक 'मुश', या पदार्थाचा फायदा रणवीरच्या ताकदीला झाला. 




गोड पदार्थांमध्ये 'न्युटेला'प्रती रणवीरची ओढ लक्षात घेता त्याची ही आवड जपत डाएटही केंद्रस्थानी ठेवत PoD supplyकडून त्याच्यासाठी खास, अव्हाकाडो मूस तयार करण्यात आलं होतं, ज्यामध्ये ९० टक्के डार्क चॉकलेट आणि अव्हाकाडोचा वापर करण्यात आला होता. रणवीरच्या आहारामधील हे पदार्थ पाहता PoD supplyकडून पुरवल्या जाणाऱ्या चवदार आणि आरोग्यास पूरक अशा पदार्थांविषयी सर्वसामान्यांमध्येही कुतूहल आहे. 


रणवीरशिवायही इतर बरेच सेलिब्रिटी त्यांच्या धकाधकीच्या आयुष्य़ात PoD supplyलाच पसंती देतात. ज्यामध्ये त्यांच्या डाएटला कायमच केंद्रस्थानी ठेवण्यात येतं. तुम्हीही या PoD supplyकडून पुरवण्यात येणाऱ्या आरोग्यदायी खाण्याच्या सेवेचा उपभोग घेऊ शकता. तेव्हा आता सेलिब्रिटींचा फिटनेस मंत्रा दैनंदिन आयुष्यात अवलंबण्यासाठी तुम्हीही सज्ज आहात ना?