मुंबई : शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन गट पडले की, कोणत्या गटातील पदार्थ अधिक चवीचा आणि जास्त पौष्टीक आहे याचीच रस्सीखेच सुरु होते. मांसाहाराच्या गटातील मंडळी साधी व्हेज बिर्याणीही बिर्याणी नसते असं म्हणत शाकाहाऱ्यांना हिणवतात. हा झाला गमतीचा भाग. पण, खरंच सध्या जेवणाच्या बाबतीत असे गट जरा जास्त पडू लागले आहेत. त्यातच काहींच्या निवडी मात्र तिसऱ्याच गोष्टीला आहेत. कोणाला मांसाहार आवडतो पण, प्राण्यांची कत्तल नको, कोणाला मांसाहार हवा पण पर्यावरणाला इजा नको असं बरंच काही. अभिनेता रितेश देशमुखही अशाच एका गटात मोडतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कट्टर मांसाहारी अशी ओळख असणारा रितेश गेल्या चार वर्षांपासून शाकाहाराकडे वळला आहे. पण, आता मात्र तो म्हणतोय की मी सतत मांसाहाराबाबतच Imagine करु शकतो. आता हे कसं शक्य? तुम्हालाही पडला ना प्रश्न? 


तर, बॉलिवूडमधला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी Genelia Deshmukh या दोघांनीही मिळून आता एका नव्या व्यवसायाची सुरुवात केली आहे. ज्या माध्यमातून ते खवय्यांच्या जीभेचे चोचले पुरवणार आहेत. बरं, तेसुद्धा प्राणीमात्रांना आणि पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता. 


अतिशय कल्पक आणि तितक्याच हितकारी अशा मार्गानं जात या जोडीनं Imagine Meats नावाची एक नवी संकल्पना अंमलात आणली आहे. जर्मनी, भारत आणि अमेरिकेतील तज्ज्ञांच्या मदतीनं, त्यांच्या सल्ल्यानंतर अनेक गोष्टींचे निकष पूर्ण करत या जोडीनं नव्या व्यवसायाची सवात केली आहे. गणेशोत्सवादरम्यानच त्यांनी या नव्या व्यवसायाची घोषणा केली. 




प्लांट बेस्ड मीट, अर्थात वनस्पती आणि तत्सम पदार्थांपासून मांसाहाराचीच चव मिळणारे प्रोडक्ट्स या संकल्पनेअंतर्गत तयार करण्यात आले आहेत. यामध्ये बिर्याणीपासून अगदी कबाब आणि इतरही अनेक पदार्थांचे पर्याय खवय्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. इमॅजिनची स्वतंत्र अशी वेबसाईटही तयार करण्यात आली आहे, जिथं तुम्हाला हे सर्व पर्याय उपलब्ध होणार आहेत. काय मग, आहे ना रितेशची आणि त्याच्या पत्नीही ही अफलातून आयडियाची कल्पना?