मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचं वैयक्तिक आयुष्य कायमच चर्चेत असतं. सध्या सैफची पत्नी करिना कपूर असली, तरीही अमृता ही त्याची पहिली पत्नी होती ही बाब काही लपून राहिलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच सैफनं अमृताशी लग्न केलं होतं. वयानंही तो अमृताहून बराच लहान होता. 


सैफ आणि अमृताच्या नात्यात सुरुवातीला सर्वकाही सुरळीत होतं. पण, नंतर मात्र समीकरणं बदलत गेली. 


लग्नानंतर 13 वर्षांनी सैफ आणि अमृतानं वेगळं होण्याचा निर्णय घेतला. बरं हे सर्व इथेच थांबलं नाही. 


पोटगी म्हणून तिनं सैफकडे तेव्हा, 2004 मध्ये तब्बल 5 कोटी रुपयांची मागणी केली होती. 


इतकंच नव्हे, तर मुलगा इब्राहिम मोठा होईपर्यंत सैफनं दर महिन्याला 1 लाख रुपये देणंही बंधनकारक असावं अशी अट समोर ठेवली होती. 


एका मुलाखतीत सैफनं याचा खुलासा करत, माझ्याकडे इतके पैसे नव्हते. मी कोणी शाहरुख खान थोडी होतो; असं वक्तव्य केलं. 


असं असतानाही सैफनं अमृताला दिलेल्या वचनाखात जे करावं लागेल ते करेन पण, तिला हवं ते देईन असा निर्धार केला होता. 


अमृताशी वेगळं झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनंतर सैफनं अभिनेत्री करिना कपूर हिच्याशी लग्नगाठ बांधत पुन्हा एका नव्या आयुष्याची सुरुवात केली.