सांगलीच्या राजघराण्यातील मुलीवर जडला सलमानचा जीव, मग पुढे काय झालं?
काळ पुढे गेला नवे कलाकार आहे. पण, सलमानची लोकप्रियता मात्र तसूभरही कमी झालेली नाही.
मुंबई : अभिनेता सलमान खान यानं अगदी त्याच्या पहिल्या चित्रपटापासूनच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. म्हणजे सलमान समोर आला रे आला, की इथं प्रेक्षकांमध्ये शिट्ट्या आणि टाळ्या सुरु झाल्याच म्हणून समजा. काळ पुढे गेला नवे कलाकार आहे. पण, सलमानची लोकप्रियता मात्र तसूभरही कमी झालेली नाही. (Salman khan Bollywood)
हा अभिनेता कायमच चाहत्यांना आनंद देताना दिसतो. हा, जर त्याची कोणतीही गोष्ट चाहत्यांना सतावत असेल तर ती म्हणजे अद्यापही त्याचं अविवाहित असतं. पन्नाशीच्या पुढे वय गेलेलं असतानाही सलमानला त्याची जोडीदार भेटलेली नाही.
ऑनस्क्रीन त्यानं ज्यांच्यावर प्रेमक केलं त्यांपैकीही बऱ्याच अभिनेत्रींची लग्न झाली. सलमाननं प्रेम केलेली, जीव ओतलेली अशीच एक अभिनेत्री, भाग्यश्री.
‘मैने प्यार कियां’ या चित्रपटातील भोळीभाबडी सुमन म्हणजे हीच ती भाग्यश्री. सध्याची भाग्यश्री हिमालय दासानी. भाग्यश्रीनं हिमालय दासानीशी लग्न केलं त्यावेळी तिच्या कुटुंबातून कोणाचीच हजेरी नव्हती.
परिणामी तिचं कुटुंब फारसं प्रकाशझोतात आलं नाही. पण, जाणून आश्चर्यच वाटेल की तिचा संबंध थेट राजघराण्याशी आहे. तोसुद्धा महाराष्ट्रातील सांगली प्रांताच्या राजघराण्याशी.
महाराष्ट्रातील सांगलीच्या राजघराण्यात भाग्यश्रीचा जन्म झाला होता. श्रीमंत राजा विजयसिंह राव माधोराव पटवर्धन यांची ही कन्या. भाग्यश्रीचं संपूर्ण नाव, श्रीमंत राजकुमारी भाग्यश्री राजे पटवर्धन असं आहे.
याच भाग्यश्रीच्या आणि सलमानच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला तुम्हीआम्ही भरभरून प्रतिसाद दिला. हिच भाग्यश्री सलमानच्या मनात घर करून गेलेली सुमन होती. ही तिच सुमन होती, जिच्यावर सलमाननं ऑनस्क्रीन का असेना पण जीवापा प्रेम केलं होतं. बाकी खासगी आयुष्यातली सलमानची प्रेमप्रकरणं तुम्हाला ठाऊक असतीलच.