Katrina- Vicky wedding : पाहा लग्नाला काही तास उरलेले असतानाच विमानतळावरुन सलमान कुठे निघाला ?
एक बार कमिटमेंट कर दी....
मुंबई : कतरिनाचं लग्न विकी कौशलशी होत असलं तरीही चर्चेत मात्र सलमान खान आला आहे. सलमान चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे चाहत्यांना पडणारा एक प्रश्न. बी- टाऊनचा हा भाईजान आणि कतरिनाचा एकेकाळी खास मित्र असणारा सलमान यावेळी तिच्या लग्नाला जाणार, की नाही हाच तो प्रश्न.
चर्चांच्या याच वर्तुळात आता सलमानला मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं आहे.
इन्स्टाग्रामवर या व्हिडीओनं धुमाकूळ घातला आहे. सलमान खरंच राजस्थानच्या दिशेनं रवाना झाला की काय, याबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
पण, मुळात तसं नाही. 'दबंग' टूरसाठी तो सध्या रियाधला रवाना झाला आहे. 10 डिसेंबरला रियाधमध्ये त्याचा हा शो पार पडणार आहे. खुद्द सलमाननंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली होती.
सलमानचं कुटुंबही कतरिनाच्या लग्नाला गैरहजर
सलमान नाही तर किमान त्याच्या कुटुंबीयांना तरी कतरिनाच्या लग्नात पाहण्याची संधी मिळेल असं अनेकांना वाटत होतं.
पण, भाईजानची बहिण अर्पिता हिनं आपल्याला लग्नाचं बोलवणंच नसल्याचं म्हणत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.