सलमानचा `अंतिम` पाहण्यापूर्वी समीक्षक का म्हणतायेत `मुळशी पॅटर्न` पाहाच
`मुळशी पॅटर्न` नव्यानं ब्लॉकबस्टर ठरण्याच्या मार्गावर
मुंबई : अभिनेता सलमान खान आणि आयुष शर्मा यांचा चित्रपट 'अंतिम द फायनल ट्रूथ' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्या क्षणापासूनच एका मराठी चित्रपटाशी त्याची तुलना होऊ लागली.
समाजातील वास्तव मांडत एका वेगळ्या विश्वावर प्रकाश टाकणारा हा मराठी चित्रपट आहे 'मुळशी पॅटर्न'.
सलमानच्या 'अंतिम'पुढे आता मुळशी पॅटर्नचं आव्हान उभं असून, दिग्दर्शकानं जर हा हिंदी रिमेक केला आहे, तर त्याला न्याय द्यावा अशीच अपेक्षा समीक्षक आणि काही जाणकार प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे.
'मुळशी पॅटर्न', अर्थात ओम भूतकरची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटामध्ये असे काही घटत आहेत जे सलमानच्या 'अंतिम'वर भारी पडू शकतात.
गावापासून शहरापर्यंतचा प्रवास, त्याहूनही यामध्ये असणारा फरक हाच चित्रपटाचा पाया. गुन्हे आणि पोलीस जगतामध्ये असणारा संघर्ष चित्रपटातून अतिशय प्रत्ययकारीपणे दाखवण्यात आला आहे.
मुळशी पॅटर्नचं कथानक राहुल्याच्या अवतीभोवती फिरत असलं तरीही त्यामध्ये कुठेच राहुल्याची वृत्ती अधोरेखित करत नाही. माणसाला सर्वसामान्यांमध्ये येण्यासाठी किती अडचणी आणि अडथळे येतात हे चित्रपटातून पाहायला मिळतं.
राहुल्याची भाषा, त्याचं वावरणं हे सारंकाही अतिशय वास्तववादी रुपाने चित्रपटात साताकारण्यात आलं आहे.
चित्रपटात इन्सपेक्टर विठ्ठल या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे अभिनेता उपेंद्र लिमये. उपेंद्रच्या अभिनयाची जोड मिळाल्यामुळे 'अंतिम'मध्ये याला न्याय दिलेला असावा अशीच प्रेक्षक आणि समीक्षकांची अपेक्षा आहे.
'अंतिम' हा चित्रपट 'मुळशी पॅटर्न'चा हिंदी रिमेक आहे असं सांगितलं जात असल्यामुळे आता तुलना होणं स्वाभाविक आहे.
'अंतिम'मध्ये आयुषला केंद्रस्थानी ठेवलं जाणार की प्रसिद्धीसाठी सलमानलाही तितकीच जागा दिली जाणार हा महत्त्वाचा प्रश्न.
मराठी चित्रपटाशी 'अंतिम'ची होणारी तुलना स्वाभाविक आहे. त्यामुळे आता कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी प्रवीण तरडे दिग्दर्शित 'मुळशी पॅटर्न' नक्की पाहा असंच समीक्षक सांगत आहेत.