मुंबई : सलमान खानच्या नावाचा जिथे उल्लेख होतो तिथे चर्चांना वाव मिळत नाही, असं फार क्वचितच घडतं. सध्या मात्र त्याची चर्चा होतेय पण, यावेळी कोणा एका खास व्यक्तीमुळं सलमानच्या नावाभोवती चर्चांचं वलय आहे. ही खास व्यक्ती म्हणजे खान कुटुंबातील सर्वांचाच लाडका, सलमानची बहीण अर्पिता खान शर्मा हिचा मुलगा अहिल शर्मा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुपेरी पडद्यावर दबंगगिरी दाखवणारा सलमान हा प्रत्यक्ष जीवनात काही खास छंद जोपासतो. याच छंदांपैकी एक म्हणजे चित्रकला. सलमान एक चांगला चित्रकार असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा याचा प्रत्यय आला. सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये तो भाचा अहिल याच्यासोबत चित्रकला करताना दिसत आहे. हा व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. 


कॅन्व्हासवर पसरलेल्या रंगांमध्ये अहिलला दंगा करु देणाऱ्या सलमानला पाहून त्याचं हे रुपही सर्वांच्याच मनाचा ठाव घेत आहे. मामाच्या पावलावर पाऊल ठेवत चित्रकलेच्या या विश्वात रमलेल्या अहिलला पाहून नेटकऱ्यांनीही 'वाह भांजे' अशीच प्रतिक्रिया दिली आहे. 


चित्रकलेबाबत फारसं कळत नसतानाही रंगांमध्ये एकच कल्ला करणारा अहिल पाहता बालपणीचे निरागस दिवस पाहून अनेकांनाच त्याचा हेवाही वाटत आहे. विरल भयानीनं हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्याला अनेक व्ह्यूज आणि लाईक्सही मिळाले आहेत. 



दरम्यान, सलमानच्या वर्कफ्रंटबाबत सांगावं तर, येत्या काळात तो 'अंतिम' आणि 'टायगर 3' या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.2 ऑक्टोबरपासून तो 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोच्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालनही करताना दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यासाठी त्याला मानधन स्वरुपात मोठी रक्कम मिळाली आहे.