bollywood actor salman khan at airport with bodygaurds: बॉलीवूडचा भाईजान सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर पोलीस यंत्रणा खूप सतर्क झालेय आणि भाईजानची सिक्युरिटी आणखी टाईट करण्यात आलीये.सलमान खानचे चाहते जगभर पसरले आहेत सगळीकडे त्याचे फॅन्स आहेत,त्यामुळे  सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आली तेव्हा त्याच्या फॅन्स मध्ये खूप संतापाची लाट उसळली होती . 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे आता सलमान खान जिथे कुठे जाईल त्याची सुरक्षा  खूप कडक ठेवण्यात आलीये.नुकताच सलमान खान दुबईला गेला होता तिथून तो परतला आहे त्यावेळी मुंबई एरपोर्टवर त्याला स्पॉट करण्यात आलं यावेळी सलमान खानसोबत पोलिसांचा कडक बंदोबस्त,बॉडीगार्ड्स दिसून आले .या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता ग्रे रंगाचा शर्ट आणि ब्लु पॅन्ट घालून सलमान खान दिसून आला त्याच्यासोबत त्याचा पर्सनल बॉडीगार्ड शेरा सुद्धा होता. 


यावेळी एरपोर्टवर त्याचे फॅन्स होते सर्वानी सलमान खानच्या सुखरूपतेसाठी प्रार्थना केली या व्हिडिओवर त्याच्या फॅन्सनी शुभेच्छा दिल्या आहेत काहींनी त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना केलीये कि त्याला उदंड आयुष्य लाभो आणि देव त्याची रक्षा करो 



मिळाली होती जीवे मारण्याची धमकी 
सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारं एक निनावी पत्र आलं होतं ,ज्यात सिद्दू मुसेवाला पेक्षाही त्याची हालत वाईट करून आणि मारू असं म्हटलं होत त्यांनतर सलमान खानची सुरक्षा आणखी कडक करण्यात आलेय.