सलमान ऑनस्क्रिन इंटिमेट का होत नाही... अखेर कारण समोर
यामध्ये एक गोष्ट ही सातत्यानं टिकून आहे, ती म्हणजे...
मुंबई : सलमान खान... फक्त नाव घेताच अनेकांच्या नजरा वळतात. बॉलिवूडमध्ये मागील काही दशकांपासून सातत्यानं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा हा अभिनेता इतरही अनेक कारणांमुळे चर्चेत असतो. निमित्त वेगवेगळी असली तरीही यामध्ये एक गोष्ट ही सातत्यानं टिकून आहे, ती म्हणजे सलमानच्या लग्नाची आणि त्याच्या जीवनातील काही निर्णयांची.
सलमानच्या खासगी आयुष्याशी संबंधित अशाच एका गोष्टीचा खुलासा नेमका झाला. 'अंतिम- द फायनल ट्रूथ' या चित्रपटाच्या निमित्तानं सलमाननं अनेक गोष्टींचा खुलासा केला.
ऑनस्क्रीन आपण किसिंग सीन किंवा इंटिमेट सीन का देत नाही, याबाबत सांगताना त्यानं सर्वांच्या नजरा वळवल्या.
'मी साकारत असणाऱ्या भूमिका तुम्ही पाहिल्या, तर त्यामध्ये कोणीही वाईट शब्दांचा वापर करत नाही. त्यामध्ये भडकपणा नसतो किंवा ते किसिंग, इंटिमेट असं काही करत नाहीत.
मी ते सर्व करत नाही आणि माझ्या मते चित्रपट हा असाच असावा. पण, हल्ली मात्र ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे बऱ्याच वेगळ्या संकल्पना अस्तित्वात आल्या आहेत', असं सलमान म्हणाला.
मी अशा कोणत्याही गोष्टी पाहतच नाही, पण काही लोक अशा गोष्टी पाहतात आणि त्यांच्यासाठी अशा कलाकृती साकारल्या जातात, ही बाब त्यानं अधोरेखित केली.
सर्वजण इंटिमेट सीन, किसिंग सीन, भडकपणा असणारी दृश्य साकारतात म्हणून मीसुद्धा ती करेनच असं नाही, हे सलमाननं स्पष्ट केलं.
माझे आईवडील, लहान मुलं, माझ्यासाठी आदर्शस्थानी असणाऱ्या व्यक्ती मी साकारलेले चित्रपट पाहतात आणि त्यांच्यासाठी मला माझी प्रतिमा स्वच्छ ठेवायला आवडते हा मुद्दा त्यानं मांडला.
सलमाननं आतापर्यंत साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांनी पसंती दिली आहे. मग तो प्रेम असो किंवा चुलबूल पांडे.