मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan)  आणि त्याची बहिण, अर्पिता खान शर्मा या दोघांचंही नातं सर्वज्ञात आहे. सलमान आणि अर्पिता एकमेकांवर जीव ओवाळून टाकतात. अर्पिता आता लग्न होऊन सासरी गेली असली तरीही तिचं सलमानसोबत असणारं नातं काही बदललेलं नाही. पण, या नात्याची समीकरणं आता बदलू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण ठरत आहे ते म्हणजे कानांवर येणारा सलमान आणि अर्पिताचा पती, आयुष शर्मा यांच्यातील कथित वाद. सलमानचा आगामी चित्रपट 'कभी ईद कभी दिवाली (Kabhi Eid Kabhi Diwali)' सध्या बराच चर्चेत आहे. दर दिवशी चित्रपटाशी संबंधित काही ना काही माहिती समोर येतच असते. 


आता मात्र जरा वेगळीच माहिती कानांवर आली आणि ती ऐकणारेही थक्कच झाले. सलमानच्या या आगामी चित्रपटात शहनाज गिल (Shehnaaz Gill), आयुष शर्मा (Aayush Sharma) आणि जहीर इकबाल (Zaheer Iqbal) झळकणार होते. पण, आता मात्र आयुष आणि जहीर या चित्रपटात झळकणार नसल्याचं कळत आहे. 


निर्मिती संस्थेकडून आता नव्या कलाकारांचा शोध घेण्याचं काम सुरु करण्यात आल्याचंही म्हटलं जात आहे. फरहाद सामजीच्या दिग्दर्शनात साकारल्या जाणाऱ्या या चित्रपटात सलमान आणि शहनाजसोबतच आयुष शर्मा, पूजा हेगडे, राघव जुयालसुद्धा झळकणार आहेत. 


आयुष आणि जहीरच्या एक्झिटनंतर मात्र आता स्टारकास्टमध्ये मोठे बदल करण्यात येत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानी आणि जावेद जाफरीचा मुलगा मिजान जाफरी यांच्या नावांना निर्मात्यांकडून प्राधान्य देण्यात आलं आहे. 


भाग्यश्रीसोबत सलमाननं 'मैने प्यार किया' या चित्रपटात स्क्रीन शेअर केली होती. रुपेरी पडद्यावर त्यांनी साकारलेलं प्रेमी युगूल सर्वांनाच भावलं होतं. 


दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार आयुषनं चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात केली होती. पण, Salman Khan Films सोबत काही कारणास्तव वाद झाल्यामुळं त्याला बाहेरची वाट दाखवण्यात आली. 


कला जगतामध्ये सध्या हा सर्वात मोठा बदल मानला जात आहे. ज्याचं स्पष्ट कारण मात्र अद्यापही समोर आलेलं नाही.