`Sanjay Dutt ला कोणी ना कोणतरी...` माधूरी आणि संजयच्या ब्रेकअपवर पत्नीचा धक्कादायक खुलासा
संजय दत्त आणि माधूरी दीक्षित यांनी साजन आणि खलनायक अशा सुपरहिट चित्रपटांतून एकत्र काम केलं आहे.
Sanjay Dutt and Madhuri Dixit: संजय दत्तच्या जीवनावरचा संजू (Sanjay Dutt Film Sanju) हा चित्रपट आला ज्यात संजय दत्तला 308 गर्लफ्रेंड्स होत्या असं दाखवण्यात आलं होतं. त्याला खरंच इतक्या गर्लफ्रेंड्स होत्या की नव्हत्या या बद्दल नक्की सत्य काय हे कोणाला माहिती नाही परंतु संजय दत्तसोबत ज्या अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं होतं तिच्यासोबतच्या अफेअरमुळं संजय दत्त तेव्हा प्रचंड चर्चेत होता आणि ती म्हणजे धकधक गर्ल माधूरी दीक्षित. (Madhuri Dixit)
संजय कपूर आणि माधूरी दीक्षित यांच्या ब्रेकअपपेक्षा (Sanjay Dutt and Madhuri Dixit Breakup) त्यांच्या अफेअरच्या चर्चा एकेकाळी प्रचंड गाजल्या होत्या. माधूरी आणि संजय दत्त हे 90 च्या दशकात चित्रपटांच्या निमित्तानं एकत्र आले होते. त्यावेळी ते एकमेकांना डेट करत होते. अनेकांना त्यांच्या या नात्याबद्दल आजही फार इंटरेस्ट असतो. परंतु संजय दत्तच्या पत्नीनं केलेला हा खुलासा ऐकून तुम्ही आश्चर्यचकित राहिल्याशिवाय राहणार नाही.
खरंतर संजय दत्त यांच्या पत्नी रिचा शर्मा (Sanjay Dutt Wife Richa Sharma) यांनी त्या हयात असताना एका मुलाखती माधुरी आणि संजय दत्त यांच्याबद्दल खुलासा केला होता. माधूरीनं संजय दत्तचं नावं 1993 बॉम्बस्फोटात आल्यानंतर त्याच्यापासून दूर राहायला सुरूवात केली होती आणि त्यानंतर माधुरीनं संजय दत्तची साथ सोडली आणि त्याचं ब्रेकअप झालं. त्यावेळी संजय दत्तची झालेली अवस्था काय होती याबद्दल संजय दत्त यांच्या पहिल्या पत्नी रिचा शर्मा यांनी सांगितली होती.
रिचा यांनी सांगितले की माधूरीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर संजय दत्त खूपच खचला होता. त्याला मानसिक आधाराची आवश्यकता होती. रिचा यांच्या म्हणण्यानुसार संजयला रोज कोणाचा ना कोणातरी आधार हवा होता. हे कळताच रिचा अमेरिकेत उपचार घेत होत्या आणि त्या उपचार सोडून संजय दत्तच्या मदतीसाठी आल्या होत्या. संजय दत्तच्या पत्नी रिचा शर्मा या कर्करोगावर अमेरिकेत उपचार घेत होत्या.
संजय दत्त आणि माधूरी दीक्षित यांनी साजन आणि खलनायक अशा सुपरहिट चित्रपटांतून एकत्र काम केलं आहे. त्यावेळीच त्यांच्यातील जवळीक ही वाढू लागली होती. आजही या दोघांबद्दल अनेक चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होतात.