मुंबई : धर्माच्या भींती ओलांडून अनेकदा आपल्या परिनं मनाला पटतील अशाच मार्गांनी चालणारे अनेक कलाकार सध्या बॉलिवूडमध्ये पाहायला मिळतात. अशा कलाकारांमध्ये एका अशा अभिनेत्रीचा समावेश आहे जी, इस्लाम धर्माची असूनही कायम केदारनाथ मंदिर, महाकाल मंदिर अशा श्रद्धास्थळांना भेट देते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुद्वारा असो वा मंदिर किंवा मग मशीद. प्रत्येक ठिकाणी तितक्याच श्रद्धेनं पोहोचणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव आहे सारा अली खान. 


नुकतंच एका मुलाखतीत सारानं आपण मंदिरांत नेमकं का जातो, यामागचं कारण स्पष्ट केलं. 


शाहरुखनं त्याच्या मुलांना गीता, कुराण आणि बायलचा बोध दिला आहे. किंबहुना तूसुद्धा महाकाल मंदिरात गेली आहेस अशा परिस्थितीत स्वत:ला धार्मिक पद्धतीनं कितपत समृद्ध करणं तुला कसं शक्य झालं ? असा प्रश्न तिला करण्यात आला. 


अतिशय महत्त्वाच्या अशा या प्रश्नाचं उत्तर देत सारानं अप्रत्यक्षरित्या तिची खिल्ली उडवणाऱ्यांनाही काही गोष्टी स्पष्ट करुन दिल्या. 


कोणत्या धर्मामुळे नाही, तर अध्यात्मिक शक्तीमुळं आपण मंदिरात जातो, असं सारानं सांगितलं. कोणत्याही ठिकाणी गेलं असता तिथे असणारी वेगळी उर्जा आपल्या मनाला भावते, असं ती म्हणाली. 


गुरुद्वारा असो किंवा मग एखाद्या चित्रपटाचा सेट, सारानं कायमच एका अदृश्य उर्जेला महत्त्वं दिलं आहे. ज्यामुळं ती कधी मंदिर तर कधी एखाद्या दर्ग्यामध्ये दिसते. 


साराच्या केदाराथ दर्शनावरही अनेक प्रश्न 
फिरण्याची आवड असणारी सारा फक्त सहलीची ठिकाणं नव्हे, तर काही धार्मिक स्थळांनाही सातत्यानं भेट देताना दिसते. 



हल्लीच तिनं केदारनाथ आणि महाकाल मंदिरालाही भेट दिली होती. उदयपूरमध्ये असताना ती एकलिंगनाथजी या मंदिरातही गेली होती. 



साराच्या या 'टेंपल रन'वर काहींनी टीकेची झोड उठवत यामध्ये धर्माचा मुद्दाही समोर आणला. पण, सारानं दिलेलं उत्तर टिका करणाऱ्यांना शांत करण्यासाठी पुरेसं आहे असं म्हणायला हरकत नाही.