मुंबई : अभिनेता शाहरुख खान यानं अखेर अनेक दिवसांनी मुलगा आर्यन खान याची भेट घेतली. मुलाची भेट घेण्यासाठी शाहरुख  (Shah Rukh Khan) कारागृहाची पायरी चढला. जवळपास पंधरा ते वीस मिनिटांच्या या भेटीमध्ये शाहरुख आणि आर्यन दोघंही भावूक झाल्याचं म्हटलं गेलं. या साऱ्यातच आता शाहरुखचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्यनला (Aryan Khan) भेटण्यासाठी गेलं असतानाच हा व्हिडीओ. जिथं जेलमधून निघतेवेळी शाहरुख जेव्हा बाहेर आला, तेव्हा तिथे असणाऱ्य़ा चाहत्यांनी त्याला अभिवादन केलं. आपल्यावर अडचणींचा डोंगर कोसळलेला असतानाही त्यानं तिथे आपल्या चाहत्यांना मात्र निराश केलं नाही. चाहत्यांचं अभिवादन स्वीकारत शाहरुखनं त्यांच्यापुढे हात जोडले आणि गर्दीतूनच वाट काढत तो तिथून बाहेर पडला. 


शाहरुखची ही कृती चाहत्यांचं मन पुन्हा एकदा जिंकून गेली. सोशल मीडियावरही याची बरीच चर्चा झाली. एक कलाकार म्हणून आपलंही समाजाशी आपुलकीचं नातं आहे, हेच नातं जाणत किंग खाननं स्वत:च्या अडचणी दूर ठेवत चाहत्यांचं अभिवादन स्वीकारलं. 




दरम्यान, आर्यन आणि शाहरुखच्या भेटीनंतर एनसीबीच्या टीमनं शाहरुखचं घर गाठलं. यावेळी, NCB चांगलं काम करत असून, त्याच्याकडून आर्यनला सुटका मिळण्यासाठीची आशा व्यक्त करण्यात आली.